आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Large Enterprises, MSME Sector Loan Restructuring Approved, Banks And Industries Relieved Who Facing Corona Crisis

पतधोरण आढावा:मोठे उद्योग, एमएसएमई क्षेत्राच्या कर्ज पुनर्गठनास मिळाली मंजुरी, कोरोनामुळे संकटाचा सामना करणाऱ्या बँका आणि उद्योगांना दिलासा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक मार्चआधी थकबाकीचा पूर्वेतिहास नसणाऱ्या उद्योगांनाच मिळेल ही सुविधा
  • भेट : स्टार्टअप्सना प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांतर्गत मिळेल कर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून पतधोरण आढाव्यात माेरटोरियम (कर्ज हप्त्यास तात्पुरती स्थगिती) अवधी वाढवला नाही. मात्र, केंद्रीय बँकेने काही कर्जांना एक वेळ पुनर्गठनास मंजुरी आहे. या निर्णयामुळे कोराेना संकटामुळे होणारे नुकसान सोसणाऱ्या उद्योगांचे अनेक कर्ज एनपीए होण्यापासून वाचतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कर्जाच्या पुनर्गठनामुळे कोरोना विषाणूमुळे आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या कंपन्यांना मदत मिळेल. या योजनेअंतर्गत कर्जाचे पुनर्गठन केल्यावर ते एनपीए मानले जाणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित योजनेनुसार, यामध्ये अशा कंपन्यांच्या कर्ज पुनर्गठनास मंजुरी दिली जाईल, ज्यांनी १ मार्च २०२० पर्यंत ३० दिवसांहून अधिक काळापर्यंत थकबाकी केली नाही. अशा कर्जधारकांना बँक २ वर्षांपर्यंत कर्जाची मुदत वाढवू शकते. हा प्लॅन २०२० च्या आत कधीही लागू केला जाऊ शकतो आणि हा सुरू करण्याच्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत लागू करावा लागेल. कर्ज पुनर्गठनाच्या रूपरेषेसाठी रिझर्व्ह बँकेने आयसीआयसीआय बँकेचे माजी चेअरमन के. व्ही. कामथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

भेट : स्टार्टअप्सना प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांतर्गत मिळेल कर्ज

रिझर्व्ह बँकेने प्राधान्य क्षेत्रांतर्गत वाटलेल्या कर्जा(पीएसएल)ची कक्षा वाढवून स्टार्टअपला यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत सौर प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आणि लहान व अल्पभूधारक शेतकरी व कमकुवत गटांसाठीही कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. पीएसएलअंतर्गत पात्र शाखांना बँकांकडून सुलभ अटींवर कर्ज मिळू शकेल. प्राधान्य क्षेत्रांतर्गत कृषी आणि मायक्रो एंटरप्रायजेस येतात. बँकांना अॅडजस्टेड नेट बँक कर्ज किंवा बॅलन्सशीट कर्जाबरोबर या दोन्हीपैकी जे जास्त असेल त्याच्या ४०% कर्ज प्राधान्य क्षेत्रांतर्गत वाटायचे असते.

जुलै-सप्टें.दरम्यान महागाई दर किरकोळ राहू शकतो

रिझर्व्ह बँकेनुसार, जुलै-सप्टें. तिमाहीत महागाई दर उच्च राहू शकतो. यानंतर यात घट होऊ शकते. कोरोनामुळे पुरवठ्यात अडचणी आहेत. यामुळे खाद्य व बिगर खाद्य वर्गातील वस्तूंवर महागाईचा दबाव कायम आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई दर ६.०९% राहिला. ग्रामीण क्षेत्रात हा ६.२०% व शहरी क्षेत्रात ५.९१% नाेंदला आहे.

एनएचबीसाठी १०,००० कोटी रुपयांची विशेष रोकड

रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि नॅशनल हाउसिंग बँके(एनएचबी)साठी पाच-पाच हजार कोटी रुपयांची अतिरिक्त विशेष तरलता सुविधे(एएसएलएफ)ची घोषणा केली आहे. ही रक्कम नाबार्ड व एनएचबी यांच्यात समान वाटप होईल. याचा वापर एनबीएफसी, गृह कर्ज कंपन्यांच्या मदतीसाठी होईल.

रिझर्व्ह बँकेचा नकारात्मक वृद्धी नोंदण्याचा अंदाज व्यक्त

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांच्यानुसार, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाही(सप्टेंबर २०२०) मध्ये विकास दरात घसरण राहू शकते. सध्याची स्थिती पाहता पूर्ण वित्त वर्षासाठी वृद्धिदर नकारात्मक राहण्याचा अंदाज आहे. मात्र, जीडीपी वृद्धीत किती घसरण येईल याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.

बातम्या आणखी आहेत...