आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Large Vaccination Programs In Usa Updates: After Vaccination Banks Tripled Profits; News And Live Updates

अडचणीतून सावरतेय जग:अमेरिकेत मोठ्या लसीकरण कार्यक्रमाने बाजार बहरला; बँकांचा नफा तिप्पट

न्यूयॉर्क9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था रुळावर परतण्याचे संकेत

अमेरिकी अर्थव्यवस्था कोविड-१९ महारोगराई सुरू हाेण्याच्या स्थितीत परतत असल्याचे दिसत आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत बँकांचा जोरदार नफा याचे ठोस संकेत देतात. अमेरिकी अर्थव्यवस्थेत बँकिंग व्यवसाय वाढण्याचा सरळ अर्थ खर्च वाढून बाजारात उत्साह संचारल्याचे दिसते. जानेवारी-मार्च तिमाहीत बँक ऑफ अमेरिकेचा नफा वार्षिक आधारावर दुप्पट आणि सिटी ग्रुपचा तिप्पट झाला आहे. रिटर्न ऑफ इक्विटी (आरओई) म्हणजे भांडवलाच्या हिशेबाने नफ्याचा विचार केल्यास या प्रकरणात सिटी ग्रुपच्या गुंतवणूकदारांनी २०%, जेपी मॉर्गनच्या गंुतवणूकदारांनी २९% आणि गोल्डमन सॅक्सच्या गुंतवणूकदारांनी ३३% वृद्धी प्राप्त केली आहे.

बँकांच्या शेअर्सधारकांनी एका दशकापासून जास्त अवधीपासून एवढा परतावा प्राप्त केला नव्हता. अमेरिकेत आतापर्यंत कोविड-१९ लसीच्या जवळपास २० कोटी मात्रा लोकांना टोचवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बार, रेस्तराँ, रिटेल स्टोअर आणि मॉलमध्ये वाढ होऊ लागली आहे.खर्च वाढला आणि बँकिंग व्यवसाय नव्या उंचीवर पोहोचला आहे. अमेरिकेत रोकडऐवजी क्रेडिट कार्डचा वापर होतो, यामुळे हे असे झाले आहे. याशिवाय पहिल्या तिमाहीत अनेक वस्तूंनीही यूएस बँकिंग क्षेत्राला बळ दिले.

शेअर बाजारात ट्रेडिंग वाढण्याचा यात समावेश आहे. शेअर बाजार आणि रोखे बाजारात किरकोळ ट्रेडिंग वाढल्याने जेपी मॉर्गनची इन्व्हेस्टमेंट बँकिंग युनिटचा नफा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. याच पद्धतीने २०२० च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २०२१ च्या पहिल्या तिमाहीत गोल्डमन सॅक्सचा इक्विटी-अंडररायटिंग महसूल ४०% वाढला आहे. यादरम्यान विशेष पद्धतीने अधिग्रहणाच्या उद्देशाने स्थापन कंपन्यांचा कल वाढल्याने सिटी ग्रुपच्या इन्व्हेस्टमेंट बँकेच्या उत्पन्नात ५०% पेक्षा जास्त वाढ आली.

चीनने केले चकित, जीडीपी वृद्धी १८% वर
बीजिंग| कोरोना महारोगराईत चीनने जानेवारी-मार्च तिमाहीत विक्रमी १८.३% ची विक्रमी जीडीपी वृद्धी प्राप्त करून चकित केले. निर्यात आणि देशातील बाजारात चांगल्या मागणीसोबत लहान व्यावसायिक सलग सरकारी मदतीमुळे हे यश प्राप्त करू शकले. ही वाढ बेस इफेक्टचा परिणाम आहे. कारण, चीन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वात पुढे राहिला आहे यामुळे जानेवारी-मार्च २०२० तिमाहीत चिनी जीडीपी ६.८% घटला होता. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी चीन आणि भारतासह जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या जाळ्यात होत्या.

बातम्या आणखी आहेत...