आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Larger Size Increased The Difficulties Of Large Companies; 305 Lakh Crore Market Value Rs. Decreased

तंत्रज्ञान कंपन्या:मोठ्या आकारामुळे बड्या कंपन्यांच्या अडचणी वाढल्या; बाजारमूल्य 305 लाख कोटी रु. घटले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी १९९७ मध्ये शेअरधारकांना पहिल्या पत्रात लिहिले होते की, त्यांच्या कंपनीसाठी हा आजही पहिला दिवस आहे. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, दुसरा दिवस म्हणजे थांबणे ठरेल. आत्मसंतुष्टता टाळण्याचे त्यांचे आवाहन आजही योग्य वाटते. अल्फाबेट (गुगल), अॅमेझॉन, अॅपल, मेटा (फेसबुक) आणि मायक्रोसॉफ्ट या सिलिकॉन व्हॅलीच्या पाच मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकेच्या शेअर बाजाराचा आणि अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे. त्यांचा विकास दर आणि नफा आश्चर्यकारक आहे. तथापि, या वर्षातील कमकुवत तिसऱ्या तिमाहीचे निकाल म्हणजे परिस्थिती बिघडण्याची चिन्हे आहेत. या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य यंदा ३७ टक्क्यांनी घसरले आहे. त्यांचे मूल्य ३०५ लाख कोटी रुपयांनी घटले आहे.

मोठ्या उद्योगधंद्यांचा कायदा सांगतो की, दिग्गज टेक कंपन्या स्थैर्य प्राप्त करतील. मागील तिमाहीत विक्री वाढ ९% इतकी होती, ती महागाईच्या दरापेक्षा किंचित जास्त होती. मोठ्या असल्याने कंपन्या आर्थिक चक्राशी संलग्न झाल्या आहेत. तथापि, ही वस्तुस्थिती महामारी काळात डिजिटल व्यवसायातील तेजीपासून दडलेली होती. स्मार्टफोन्स, डिजिटल जाहिराती व स्ट्रीमिंगची पोहोच कमाल पातळीवर झाली आहे. मुख्य व्यवसायातील मंदीमुळे मोठ्या कंपन्या एकमेकांच्या क्षेत्रात येत आहेत. तंत्रज्ञान कंपन्यांच्या नियमांत पेच आहे. ते त्यांच्या मालकांना आणि संस्थापकांना जास्त अधिकार देतात. काही लोकांना मतदानाचा विशेष अधिकार असतो. असे बॉस अनेकदा स्वप्न पाहणारे असल्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यांच्या मोठ्या चाली अयशस्वी होतात. फेसबुकची कंपनी मेटा बघा, ती मार्क झुकेरबर्गला नीट चालवता येत नाही. यावर्षी तिचे मूल्य ७४% घसरले आहे. त्यांचा मूळ व्यवसाय ढासळत चालला आहे. झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियाच्या पलीकडे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मेटावर गुंतवणूक केली आहे. अॅपलने पहिल्या आयफोनच्या विकासासाठी जी गुंतवणूक केली, त्यापेक्षा वीसपट जास्त पैसा ते मेटामध्ये गुंतवणार आहेत. झुकेरबर्ग यांच्याकडे ५४% मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे ते गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष करू शकतात. गुगलच्या मालकीच्या अल्फाबेटची कामगिरी चांगली, पण धिमी आहे. त्यांच्या संस्थापकांकडे ५१% मतदान हक्क आहेत.

अॅमेझॉन मध्यम स्थितीत आहे. त्यांनी ई-कॉमर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अतिविस्तारामुळे रोख प्रवाह आणि परतावा कमी झाला आहे. तथापि, कार्यकारी अध्यक्ष जेफ बेजोस यांना १५% मतदानाचे अधिकार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या म्हणण्याकडे त्यांना थोडे लक्ष द्यावे लागते. अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट या जुन्या कंपन्या आहेत. संस्थापकांकडे जास्त शेअर्स नाहीत. ते एक शेअर, एक मत या तत्त्वावर चालतात. दोन्ही कंपन्या बाहेरील लोकांचे ऐकतात. यंदा दोन्ही कंपन्यांचे निकाल पहिल्या पाच कंपन्यांमध्ये सर्वोत्तम आहेत. भांडवलावरील परताव्यात ६० टक्के घट अनेक कंपन्यांचे विलीनीकरण (कॉनग्लोमेरिटिस) मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. कंपनीचा आकार वाढणे आणि अहंकार या स्वरूपात या आजाराची लक्षणे आढळतात. कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नवीन प्रकल्प, नवीन उपक्रम आणि डेटा सेंटर तयार करण्यासाठी मोठ्या टेक कंपन्यांनी अलीकडे केलेला खर्च पाहा. मार्चमध्ये प्रथमच पाच कंपन्यांचा एकूण वार्षिक खर्च ८२ लाख कोटी रु. होता. या व्यवसायांच्या प्लांटची किंमत सुमारे ५० लाख कोटी रुपये होती. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आहे. खर्च आणि ताळेबंद वाढल्यामुळे भांडवलावरील परतावा पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत ६०% कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...