आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:1.8 लाख कोटींच्या कर्जात बुडालेल्या व्होडाफोन-आयडियाला वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न; आपला हिस्सा सरकारला देण्याचीही बिर्ला यांची तयारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुमारमंगलम यांनी मंत्रिमंडळ सचिवांना लिहिले पत्र, म्हणाले-कंपनीवरील नियंत्रण सोडण्यास राजी

प्रचंड कर्जात बुडालेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडबाबत आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्लांनी हात वर केले आहेत. ते कंपनीत आपला प्रवर्तक हिस्सा सोडण्यास तयार आहेत. त्यांनी सरकारला सांगितले आहे की, कंपनीचे अस्तित्व वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकारी किंवा देशांतर्गत वित्त कंपनीला आपला हिस्सा देण्यास तयार आहेत. मंत्रिमंडळ सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ते कंपनीवरील नियंत्रण सोडण्यासही तयार आहेत.

तीन वर्षांत ८५% घटले कंपनीचे मूल्यांकन; बिर्लांचा हिस्सा २७%, त्याचे मूल्य आता ६४०१ कोटी रुपये व्होडाफोन इंडियाचे प्रवर्तक व अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला आहेत. कंपनीत त्यांचा २७% (६४०१ कोटी रुपये) आणि ब्रिटनची कंपनी व्होडाफोन पीएलसीचा ४४% हिस्सा आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप २३,७०६.७० कोटी रुपये आहे. कंपनीची वाईट अवस्था पाहून दोन्ही प्रवर्तकांनी नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन इंडियावर १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीच्या बोर्डाने सप्टेंबर २०२० मध्ये २५ हजार कोटी रु. चे भांडवल गोळा करण्यास मंजुरी दिली होती, पण सरकारी मदतीविना कंपनीला भांडवल देण्यास गुंतवणूकदार तयार नाहीत. लायसन्स फी आणि स्पेक्ट्रम युसेज चार्जची व्याख्या करण्याच्या वादामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ऑपरेटरची इच्छा होती की, फक्त दूरसंचारसंबंधी आवश्यक सेवांद्वारे होणारे उत्पन्नच शेअर केले जावे, तर सरकारला भाडे, डिव्हिडंड, व्याज आणि स्थायी मालमत्तेच्या विक्रीचे उत्पन्न यांसारख्या सर्व गोष्टींत वाटा हवा आहे.

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारची मागणी योग्य ठरवली. व्होडाफोन आयडियाने भारती एअरटेलसोबत सुप्रीम कोर्टात एजीआरच्या पुन्हा गणनेसाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने मागील आठवड्यात ती फेटाळली होती. व्होडाफोन पीएलसी आणि आयडियाचे विलीनीकरण ऑगस्ट २०१८ मध्ये पूर्ण झाले होते. तेव्हा कंपनीचे मूल्यांकन १.५५ लाख कोटी रु. निश्चित केले होते. ते आता ८५%घटले आहे. कंपनीवर एजीआर थकबाकी ५०,४०० कोटी रु. आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमच्या कमी डेटा दरांमुळेही कंपनीला बाजारात टिकण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तीन वर्षांत कंपनीला ४० कोटींपैकी एक तृतीयांश ग्राहक गमवावे लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, बाजारात हिस्सेदारीवरील दबदबा कायम ठेवण्यासाठी जिओ जोपर्यंत डेटाचे दर कमी ठेवेल, तोपर्यंत इतर कंपन्यांना आर्थिक सुधारणा होण्याची अपेक्षा खूप कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...