आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Last Year Two SUVs Were Sold For Every Five Cars, Same Trend This Year Too, SUV Sales Of 6 Companies Increased By 42% In January

दिव्य मराठी विश्लेषण:गतवर्षी प्रत्येक पाच कारमागे दोन एसयूव्हीची विक्री, यंदाही हाच कल, जानेवारीत 6 कंपन्यांची एसयूव्ही विक्री 42% वाढली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात युटिलिटी व्हेइकलची आवड आणि मागणी वाढली. त्याच्या विक्रीत सलग वाढ होताना दिसतेय. २०२२ मध्ये प्रत्येक पाच कारपैकी २ एसव्हीची विक्री झाली. ऑटोमोबाइल एक्स्पर्ट‌्सच्या मते, २०२३ मध्येही हा कल वाढण्याचे संकेत आहेत. या वर्षी जानेवारीत सुमारे सर्वच कंपन्यांच्या उपयुक्तता वाहनांच्या विक्रीत उसळी आली. महिन्यात टॉप ६ कार कंपन्यांची एसयूव्हीची विक्री सरासरी ४२% वाढली. टोयोटा आणि महिंद्राच्या विक्रीत सर्वात जास्त अनुक्रमे ७५% आणि ६६% वाढ झाली. मारुती सुझुकीच्या एसयूव्हीच्या विक्रीतही ३३% वाढ झाली. टाटा मोटर्सच्या बाबतीत, ही वाढ १८% होती, ह्यंुदाई एसयूव्हीच्या विक्रीत सुमारे १४% वाढ झाली. वास्तविक लोकांना त्यांच्या कारने ३०० ते ५०० किमी प्रवास करायचा आहे.

महागाई असूनही महागड्या गाड्यांची विक्री वाढली गेल्या काही महिन्यांत महागाई वाढूनही महागड्या कारची विक्री सलग वाढत आहे. उपयुक्तता वाहनांचा यात समावेश आहे. ऑटोमोबाइल एक्स्पर्ट विशाल दामले यांनी सांगितले, २००८-०९ नंतर सुमारे १० वर्षांपर्यंत बी-सेगमेंटच्या गाड्या (उदा- मारुती झेन, ह्यंुदाई आय२०, होंडा जॅझ आदी)चा काळ होता. पण कोविडनंतर एसयूव्हीची विशेषतः कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे युग सुरू झाले आहे.

गेल्या महिन्यात टोयोटा एसयूव्हीची विक्री ७५%, महिंद्राची ६६% वाढली कंपनी जाने.2022 जाने.2023 वाढ मारुती-सुझुकी 26,624 35,353 33% टाटा मोटर्स 40,777 47,987 18% महिंद्रा अँड महिंद्रा 19,664 33,040 66% किया मोटर्स 19,319 28,634 48% ह्युंदाई मोटर्स 24212 27,532 14% टोयोटा किर्लोस्कर 7,328 12,835 75%

होंडा, एमजी मोटर्स वगळता सर्वच कंपन्यांची विक्री जानेवारीत वाढली कंपनी 2022 2023 वाढ मारुती-सुझुकी 128,924 147,348 14% ह्युंदाई 44,022 50,106 14% होंडा 10,427 7,821 -25% एमजी मोटर इंडिया 4,306 4,114 -4% (जानेवारीतील पॅसेंजर कार+एसयूव्ही विक्रीचे आकडे)

बातम्या आणखी आहेत...