आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कारच्या डिझाइनमध्ये सतत बदल होत आहे. विशेषत: इलेक्ट्रिक गाड्यांनी कारच्या डिझाइनला नवे रूप दिले आहे. आगामी एका दशकात जगात साठ ते सत्तर टक्के गाड्या इलेक्ट्रिक असतील. या गाड्यांत सध्याच्या गाड्यांसारखे इंजिन नसेल. यामुळे गाड्यांमध्ये जागा वाढेल आणि चार मीटरच्या कारमध्येही ७ ते ८ प्रवाशांची बसण्याची जागा होऊ शकेल. देशातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी टाटा मोटर्सचे डिझाइन हेड प्रताप बोस यांनी दैनिक भास्करचे व्यापार प्रतिनिधी अजय तिवारी यांच्याशी चर्चा केली. त्यातील काही अंश...
कारला डिझाइन करण्यात किती लोकांचा सहभाग असतो?
भारतीय निर्मात्यांमध्ये टाटाची डिझाइन टीम सर्वात मोठी आहे. यूके, इटली आणि भारतात आमचे डिझाइन स्टुडिओ आहेत. यामध्ये १३ देशांतील १५० लोक काम करतात. आमचे काम संकल्पनेतून सुरू होते. इंटेरिअर डिझायनिंग, एक्स्टिरियर डिझायनिंग, कलर, मटेरियल, फिनिशसारख्या बाबींची डिझाइन होते.
कार डिझाइनच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आगामी काही वर्षांत अशी कोणती वस्तू आहे,जी पूर्ण बदलली जाईल?
आगामी एका दशकात दोन महत्त्वाचे बदल असतील. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढेल. गाड्या आधीपेक्षा जास्त सुरक्षित आणि स्वायत्त होतील. याशिवाय २०३० पर्यंत साठ ते सत्तर टक्के गाड्या इलेक्ट्रिक असतील. सध्याच्या गाड्यांमध्ये एक तृतीयांश जागा इंजिनची असते. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये इंटर्नल कंबश्चन इंजिन निघेल.
इंटर्नल कंबश्चन इंजिन निघाल्याने तुमच्यासमोर डिझाइनबाबत आव्हाने काय असतील?
हे आव्हान नाही, उलट एक संधी आहे. एवढी जागा मोकळी होत असेल तर त्याचा वापर प्रवाशांची क्षमता वाढवण्यात होऊ शकते. सध्या चार मीटरपेक्षा जास्त गाड्यांमध्ये दोन रोमध्ये पाच आसनांची जागा असते. इंजिन निघाल्यावर चार मीटरमध्ये सहज सात-आठ लोक बसू शकतील. गाडीचे ले-आऊट बदलू शकते. समोरासमोर बसू शकतात.
एका कारसाठी डिझाइन किती महत्त्वाची असते?
डिझाइनच एखाद्या उत्पादनास इतरांपेक्षा वेगळी करते. सध्या लोक ऑनलाइन गाड्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ पाहतात. डिझाइन आणि लूक आकर्षक वाटल्यास लोक डीलरशिपकडे येतील. २० सेकंदांत ग्राहकास आकर्षित न करू शकल्यास ग्राहक हातातून निघून जाईल. त्यामुळे डिझाइन खूप महत्त्वाची आहे. गाडीच्या डिझाइनची छाप पडून लोक ती खरेदी करतात.
एखाद्या कारची डिझाइन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेता?
कारचा संभाव्य ग्राहक कोण हे प्रथम लक्षात घेतले जाते. टाटाच्या गाड्या अवजड असतात, त्या पुरुषांसाठी असतात, असे आधी मानले जात होते. महिलांना टाटा मोटर्सचा ग्राहक करण्यासाठी टियागोला डिझाइन केले. हिला स्लीक आणि कलरफुल केले. सध्या हिची लोकप्रियता आम्ही पाहत आहोत.
कोणत्याही कारच्या निर्मितीत साधारण किती अवधी लागतो?
कोणत्याही कारच्या निर्मितीसाठी सुमारे ४ वर्षे लागतात. यामध्ये डिझाइनचा वेळ १८ ते २० महिन्यांचा असतो. आपल्याला १८ महिन्यांत पूर्ण गाडी डिझाइन करून डेटा जाहीर करावा लागतो. सुटे भाग पुरवठादार, मॅन्युफॅक्चरिंग युनिटशिवाय कंपनीच्या अन्य विभागांना डेटा दिला जातो. नंतर चाचणी होते. त्यामुळे १६ ते १८ महिन्यांत आपले डिझायनिंगचे काम संपले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.