आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विगी कंपनीची मुनलाईटींग पॉलिसी:पुर्णवेळ कर्मचारी नोकरीसोबत अन्य कामही करू शकेल; 'पीपल फर्स्ट' च्या दिशेने कंपनीचे पाऊल

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने बुधवारी नवीन कार्य धोरण जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत कर्मचारी बाह्य प्रकल्पांवर काम करू शकणार आहे. जे स्विगीमध्ये पूर्णवेळ कर्मचारी आहेत. असे कर्मचारी आठवड्याच्या शेवटी किंवा कार्यालयानंतर अन्य कोणतेही काम करू शकतो. मात्र, त्या कर्मचाऱ्यामुळे कंपनीच्या उत्पादकतेवर कोणताही परिणाम होणार नाही. व्यवसायात हितसंबंधाचा संघर्ष नसावा, हे उद्योगाचे पहिले मुनलाईटिंग पॉलीसी म्हणून ओळखले जात आहे.

स्विगी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, कोरोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना त्यांच्यातील आवडत्या क्षेत्राचा व प्रतीभेचा उलगडा करता आला. अशा परिस्थितीत अतिरिक्त कार्य करून कुटुंबासाठी उत्पन्नाचा नवीन सोर्स उपयुक्त ठरू शकतो. गेल्या आठवड्यात स्विगीनेही वर्क फ्रॉम एव्हरी व्हेअरची घोषणा केली हे बहुतेक कंपन्यांची पॉलीसी राहीली आहे. कर्मचारी टीमची गरज आणि व्यवस्थापनाच्या अभिप्रायानंतर ही घोषणा करण्यात आली.

व्यावसायिक अन् वैयक्तिक विकास

स्विगीने मुनलाईटिंग पॉलीसीबाबत सांगीतले की, एनजीओसोबत स्वयंसेवा करणे असो, डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणे असो किंवा सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणे. पूर्णवेळ रोजगार व्यतिरिक्त कोणताही कर्मचारी अशा प्रकल्पांवर काम करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते.

कर्मचाऱ्यांच्या आवडीला संधी देणे

स्विगी कंपनीचे एचआर विभागाचे प्रमुख, गिरीश मेनन यांनी सांगीतले की, “मूनलाइटिंग पॉलिसीसह, आम्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्णवेळ नोकरीसह आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहित करण्याचा हेतू आहे. जागतिक दर्जाची 'पीपल फर्स्ट' संस्था तयार करण्याच्या दिशेने आमच्या कंपनीच्या प्रवासातील हे आणखी महत्त्वाचे पाऊल आहे. कर्मचाऱ्यांनी देखील मुनलाइटिंग पॉलिसीत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...