आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Lawsuit Over Data Theft On Instagram; Attempts To Settle The Company's Rs 4,875 Crore Lawsuit

डेटा चोरी:इन्स्टाग्रामवर डेटा चोरीबाबत खटला; कंपनीचे 4,875 कोटींच्या खटल्यात तडजोडीचे प्रयत्न

रॉबर्ट बर्नसन | कॅलिफोर्नियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगीपणाच्या उल्लंघन प्रकरणात फेसबुकला मोठा दंड

बेकायदेशीर पद्धतीने डेटा चोरीसाठी कुख्यात फेसबुकचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. डेटा चोरीबाबत या वेळी कंपनीच्या मालकीचा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खटला दाखल केला आहे. इन्स्टाग्रामने युजर्सचा बायोमेट्रिक डेटा एकत्र केल्याचा आरोप आहे.

नवा खटला दोन दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या रेडवूड शहरातील स्टेट कोर्टमध्ये दाखल केला आहे. या प्रकरणात गेल्या महिन्यात सोशल मीडिया कंपनीने हा खटला मिटवण्यासाठी ४,८७५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

याचिकेतील आरोपानुसार, कंपनीने १० कोटी इन्स्टाग्राम युजरचा बायोमेट्रिक डेटा त्यांच्या परवानगीशिवाय संकलन आणि साठवणूक केली आहे. त्यांनी आपल्या नफ्यासाठी याचा वापर केला आहे. कंपनीने हे काम प्रायव्हसी कायद्याचे नियत-कायद्याचे उल्लंघन ठरते. कायद्यानुसार, कंपनीला प्रती युजर डेटा चोरीसाठी १००० डॉलरचा दंड भरावा लागू शकतो. हे सिद्ध झाल्यास कामातील निष्काळजीपणा किंवा ते जाणीवपूर्वक केले असेल तर हा दंड ५००० डॉलरपर्यंतही होऊ शकतो. खटल्यानुसार, फेसबुकने केवळ या वर्षाच्या सुरुवातीपासून इन्स्टाग्राम युजरला त्यांची माहिती संकलित करत असल्याचे सांगण्यात आले.

फेब्रुवारी २०२० मध्येही इन्स्टाग्रामशी संबंधित एका मोठ्या डेटा लीकचे प्रकरण समोर आले होते. तेव्हा हजारो इन्स्टाग्राम युजर्सचे युजरनेम-पासवर्ड्‌स ऑलनाइन लीक झाले होते. टेक क्रंचच्या अहवालानुसार, युजर्सचे पासवर्ड सोशल पासवर्ड्‌स सोशल कॅप्शन नावाने एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मकडून एक बगमुळे लीक केले गेले.

जुलै २०१९ मध्ये फेसबुकवर ३४ हजार कोटी रु. दंड

अमेरिकी नियामकाने जुलै २०१९ मध्ये फेसबुकवर डेटा चोरी प्रकरणात ३४ हजार कोटी रुपयां(५०० कोटी डॉलर)चा दंड लावला होता. अमेरिकेत खासगीपणाच्या उल्लंघन प्रकरणात एखाद्या कंपनीवर लावलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड होता. मार्च २०१८ मध्ये फेसबुकच्या डेटा लीकचे सर्वात मोठे प्रकरण समोर आले होते. आयोगाने फेसबुकला ८.७ कोटी युजर्सच्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षेत दोषी ठरवले होते.

बातम्या आणखी आहेत...