आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद पनगढिया म्हणतात:डॉलरच्या तुलनेत रुपया घसरू द्यावा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया आणखी घसरू द्यावा, असे कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया म्हणतात. त्यांच्या मते, ही रणनीती भारतासाठी योग्य असल्याचे सिद्ध होईल. पनगढिया म्हणाले, “प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत आपल्या रुपयाचे मूल्य जास्त आहे. म्हणजेच, त्याची किंमत वास्तविक पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरबीआयने त्यात आणखी घसरण होऊ द्यावी.’ ते म्हणाले की, भारताला ब्रिटन आणि युरोपीय संघासोबत मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करत सीमा शुल्क खूपच कमी करण्याची गरज आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत देशाची निर्यात समर्पक राहू शकते. वेगाने वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रणासाठी जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. यानंतर जगभरातील बाजारात विक्री झाली. जुलैमध्ये रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरून विक्रमी ८०.०६ पर्यंत खाली आला होता. भारताचा व्यापार कमी झाला तरी जुलैत वाढून विक्रमी उंचीवर पोहोचला. आरबीआय म्हणते, रुपया विक्रमी पातळीपर्यंत खाली आल्याने रुपयात अनियंत्रित चढउतार होऊ देणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...