आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न- उत्तर:डिजिटल स्टॉकमध्ये फायदा अद्याप मोठा विषय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लॉन्ग टर्मसाठी कुठे गुंतवणूक करू? -आशिष सारस्वत लार्ज कॅपमध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, मारुती, टायटन, टाटा कंझ्युमर, रिलायन्स, अल्ट्राटेक, बीईएलचा विचार करा. मिड कॅपमध्ये मदरसन वायरिंग, ट्रेंट, ज्युबिलियंट फूड, ओबेरॉय, इंडियन हाॅटेल्स उत्तम.

शेअर्समध्ये २-३ लाख टाकण्याची ही योग्य वेळ आहे? - जितेंद्र प्रजापती शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी कोणती वेळ योग्य आहे, हे ठरवणे अवघड असते. एकरकमी गुंतवणूक न करता दीर्घ काळासाठी योग्य पद्धतीने थोडी थोडी गुंतवणूक करणे योग्य राहील.

पोर्टफोलिओ पाहून सांगा कुठे राहावे, कुठे नाही- एस.पी. शर्मा टाटा पाॅवर, सीडीएसएल, जी आणि ट्रायडंट होल्ड करू शकता. टाटा स्टील, हिंदुस्थान झिंक आणि नाल्कोतून बाहेर पडा. अदानी पाॅवर, अदानी विल्मर, पतंजली फूड्स, रेणुका शुगरवर आमचा कोणताही दृष्टिकोन नाही.

पेटीएमच्या शेअर्सबाबत काय शक्यता आहे? -चंदन बागडे पेटीएमवर आमचे कव्हरेज नाही. तथापि, डिजिटल स्टॉकच्या बाबतीत सर्वात मोठा प्रश्न नफ्याचा आहे. हे कधी फायद्यात येतील हे सांगणे घाईचे ठरेल.

माझ्या पोर्टफोलिओतील काय होल्ड करू शकतो-भीम पवार तुम्ही आयसीआयसीआय बँक होल्ड करू शकता. पारादीप फाॅस्फेटला युरोपात पुरवठ्याचा फायदा मिळत आहे. कॅम्पस फूटवेअर स्पोर्ट्समध्ये वाढीची मोठी शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...