आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • LG, Which Also Manufactures Pharmaceuticals, Had To Wait 10 Years For Business In India

ब्रँडच्या यशाची कहाणी:औषधांचे उत्पादनही करते एलजी, भारतात व्यवसायासाठी १० वर्षे वाट पाहावी लागली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

| साउथ कोरियन कंपनी {स्थापना ः १९५८ { बाजारमूल्य ः ७५ हजार कोटी रु.

व्यवसायात सातत्याने वाढ करायची असेल तर बदलत्या जगानुसार व्यवसाय करण्याची पद्धत बदलली पाहिजे, असा मंत्र जगातील अव्वल उद्योजक देतात. दक्षिण कोरियाच्या ‘एलजी’ कंपनीने त्याला यशाचा मंत्र बनवला आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी लकी गोल्डस्टार या नावाने सुरू झालेल्या या कंपनीने आपली बाजारपेठ वाढवण्यासाठी नावही बदलले. ‘लाइफ इज गुड’ होताच एलजी ही जगातील प्रसिद्ध कंपनी बनली. टूथपेस्ट-क्रीमपासून सुरू झालेल्या व्यवसायानंतर टीव्ही-मोबाइल क्षेत्रात पाऊल ठेवले. आता कंपनी एआयमध्ये वेगाने वाढत आहे. भारतात १० वर्षांच्या संघर्षानंतर स्थापन झालेली ही कंपनी टीव्ही क्षेत्रातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहे. ब्रँड स्टोरीमध्ये जाणून घ्या एलजी कंपनीबाबत. एलजीचे सर्वात मोठे उत्पादन युनिट दक्षिण कोरियाच्या चांगवो येथे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने याला ‘लाइटहाऊस फॅक्टरी’ म्हणून घोषित केले आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इमारती-कारखाने इत्यादींना दीपगृह म्हणतात.

मालकीहक्क कुटुंबाकडे... एलजीची स्थापना दक्षिण कोरियन उद्योगपती कू इन-ह्योय (१९०७-१९६९) यांनी केली होती. सुरुवातीला ते सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करत होते. सध्या एलजी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कू क्वांग मो आहेत. क्वांग हा माजी अध्यक्ष कू बॉन-मू यांचा दत्तक मुलगा आहे. कू कुटुंबाकडे कंपनीचे बहुतांश शेअर्स आणि मालकीहक्क आहेत. कंपनीचा इतिहास : क्रीम, टूथपेस्ट बनवून सुरुवात केली, आता ईव्ही-सोलरवर लक्ष एलजी अधिकृतपणे १९५८ मध्ये अस्तित्वात आली, पण त्याची सुरुवात १९४७ मध्ये झाली. जानेवारी १९४७ मध्ये लकी केमिकल्स कंपनीची स्थापना झाली आणि कोरियाची पहिली क्रीम तयार झाली. १९५५ मध्ये कंपनीने टूथपेस्ट विकायला सुरुवात केली. गोल्ड स्टार कंपनीची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मितीही होते. नोव्हेंबर १९५९ मध्ये गोल्डस्टारने पहिला कोरियन रेडिओ बनवला, त्यानंतर टीव्ही बनवण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये १९ इंची रंगीत टीव्ही बनवण्यास सुरुवात केली. जानेवारी १९८३ मध्ये लकी ग्रुपचे नाव लकी गोल्डस्टार ग्रुप करण्यात आले व १९९५ मध्ये एलजी - लाइफ इज गुड करण्यात आले. २००३ मध्ये एलजी लाइफ सायन्सेसच्या एका औषधाला पहिल्यांदा अमेरिकन एफडीएची मान्यता मिळाली. २००४ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात एलजीला जगातील सर्वोत्कृष्ट आयटी कंपनी म्हणून जाहीर करण्यात आले होते. १००९ मध्ये एलजी एलसीडी पॅनेलची जगातील सर्वात मोठी उत्पादक बनली. कंपनी आता ईव्ही बॅटरी आणि सोलरवर लक्ष केंद्रित करत आहे.

कंपनीचा इतिहास : क्रीम, टूथपेस्ट बनवून सुरुवात केली, आता ईव्ही-सोलरवर लक्ष एलजी अधिकृतपणे १९५८ मध्ये अस्तित्वात आली, पण त्याची सुरुवात १९४७ मध्ये झाली. जानेवारी १९४७ मध्ये लकी केमिकल्स कंपनीची स्थापना झाली आणि कोरियाची पहिली क्रीम तयार झाली. १९५५ मध्ये कंपनीने टूथपेस्ट विकायला सुरुवात केली. गोल्ड स्टार कंपनीची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मितीही होते. नोव्हेंबर १९५९ मध्ये गोल्डस्टारने पहिला कोरियन रेडिओ बनवला, त्यानंतर टीव्ही बनवण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये १९ इंची रंगीत टीव्ही बनवण्यास सुरुवात केली. जानेवारी १९८३ मध्ये लकी ग्रुपचे नाव लकी गोल्डस्टार ग्रुप करण्यात आले व १९९५ मध्ये एलजी - लाइफ इज गुड करण्यात आले. २००३ मध्ये एलजी लाइफ सायन्सेसच्या एका औषधाला पहिल्यांदा अमेरिकन एफडीएची मान्यता मिळाली. २००४ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात एलजीला जगातील सर्वोत्कृष्ट आयटी कंपनी म्हणून जाहीर करण्यात आले होते. १००९ मध्ये एलजी एलसीडी पॅनेलची जगातील सर्वात मोठी उत्पादक बनली. कंपनी आता ईव्ही बॅटरी आणि सोलरवर लक्ष केंद्रित करत आहे.

फोकस : भारतात टीव्हीवर फोकस, नं. १ च्या स्पर्धेत

भारतातील टीव्ही मार्केट सुमारे ३५,७०० कोटी रुपये आहे. २०२१ मध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा भारतातील बाजारातील हिस्सा २७ टक्के होता. मात्र, स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये एलजीचा वाटा ८ टक्के आहे. शाओमी या विभागातील नंबर वन कंपनी आहे. एलजीचे भारतात पदार्पण आव्हानात्मक होते. भारत सरकारने परदेशी कंपन्यांच्या स्वतंत्र उत्पादनावर निर्बंध लादल्यानंतर १९८६ ते १९९६ या काळात एलजीला भारतीय बाजारपेठेत स्थान मिळाले नाही. १९९७ मध्ये परवानगी मिळाल्यानंतर एलजीने भारतात उत्पादन सुरू केले आणि पहिल्या वर्षात ३३.९७ दशलक्ष डाॅलर कमाई केली. २०१६ मध्ये एलजीला भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड पुरस्कार मिळाला.

भारतात मार्केट शेअर २९.४% रेफ्रिजरेटर २७.०% एलसीडी टीव्ही २८.७% इन्व्हर्टर एसी ३७.३% वॉशिंग मशीन ३८.५% मायक्रोवेव्ह ओव्हन स्रोत- जीएफके मार्केट शेअर 2021 पर्यंत

बातम्या आणखी आहेत...