आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • LIC Cuts Home Loan Interest Rates, Now You Can Take Home Loan At 6.66% Interest; News And Live Updates

स्वस्त कर्ज:एलआयसीने गृह कर्जाच्या व्याज दरात केली कपात, आता 6.66% व्याज दरावर घेता येईल कर्ज

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही योजना 31 ऑगष्टपर्यंत लागू असणार आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृह कर्जाचे व्याज दर आधीपेक्षा कमी केले आहेत. एलआयसीच्या या विशेष योजनेंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत 50 लाख रुपयांचे कर्ज घेता येणार आहे. परंतु, हे कर्ज केवळ पगारदारांना देण्यात येणार असल्याचे एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या योजनेतील महत्वाच्या गोष्टी

  • 50 लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर हे 6.66% टक्के करण्यात आले आहे.
  • ही योजना 31 ऑगष्टपर्यंत लागू असणार आहे.
  • कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी भरण्यात यावा.
  • ही योजना केवळ पगारदारांनाच लागू असणार आहे.
  • नवीन व्याज दर कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असून यासाठी त्यांचा सिबील स्कोअर महत्वाचा असणार आहे.

कोटक महिंद्रा 6.65% व्याज दरावर देत आहे कर्ज
गृह कर्जासाठी सर्वात स्वस्त कर्ज कोटक महिंद्रा बँक देत असून ते 6.65% व्याज दरावर देत आहेत. तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 6.70% टक्के व्याज दरावर कर्ज देत आहे. अशावेळी अनेक बँक 7 टक्क्यांवर कर्ज देत आहे.

इतर बँका किती व्याज दराने कर्ज देत आहेत

बँकव्याज दर (%)
कोटक महिंद्रा6.65
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड6.66
SBI6.70
ICICI6.70
HDFC बँक6.70
अॅक्सिस6.75
युनियन बँक ऑफ इंडिया6.80
पंजाब नॅशनल बँक6.80
बँक ऑफ बडोदा6.85
बँक ऑफ इंडिया 6.856.85

येथे समजून घ्या? LIC आणि SBI कडून कर्ज घेतल्यावर किती व्याज आणि हप्ता भरावा लागेल

कर्जाची रक्कम (रु. मध्ये)कालावधीव्याज दर (% मध्ये)हप्ता (EMI)एकूण व्याज (रु. मध्ये)
10 लाख20 वर्षे6.657,5448.11 लाख
10 लाख20 वर्षे6.667,5508.12 लाख
10 लाख20 वर्षे6.707,5748.18 लाख
बातम्या आणखी आहेत...