आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • LIC Employees Five Day Working; Life Insurance Corporation Of India Approved Work 5 Days A Week; News And Live Udpates

आठवड्यात 2 सुट्या:LIC कर्मचार्‍यांना मिळणार आठवड्यातून दोन दिवस सुट्टी; आता बँक यूनियन सुद्धा करणार मागणी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यात सरकारने दिली होती मंजुरी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी आठवड्यातून 5 दिवस कामाला मंजुरी दिली आहे. यानुसार, दर आठवड्याला दोन दिवसांची सुटी असणार आहे. एलआयसी हा नियम 10 मे पासून लागू क जाणार आहे. त्यामुळे आता एलआयसीतील कर्मचार्‍यांना सोमवार ते शुक्रवार काम शनिवार-रविवार आराम असा आठवडा असणार आहे. आतापर्यंत भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) दुसर्‍या व चौथ्या शनिवार सुरू असायची.

LIC कडून घोषणा
एलआयसीने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. त्यानुसार, 10 मे पासून ऑफिसचे वेळ सोमवार ते शुक्रवार 10 ते 5.30 पर्यंत राहणार असून शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहील असे एलआयसीने सांगितले आहे. कार्यालयातील कर्मचार्‍यांना आता चालू आठवड्यातील 7.30 तास काम करावे लागेल. एलआयसीमध्ये जवळपास 1.15 लाख कर्मचारी असून याचा सर्वांना फायदा होईल. यासंदर्भातील नियमांना सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली असल्याचेदेखील एलआयसीने सांगितले.

गेल्या महिन्यात सरकारने दिली होती मंजुरी
सरकारने गेल्या महिन्यात एलआयसीच्या मागणीला मान्यता दिली होती. एलआयसीने हा नियम आता लागू केला आहे. त्यातही गेल्या महिन्यातच एलआयसीने कर्मचार्‍यांच्या पगारात 16% ने वाढ करण्याच्या मागणीस मान्यता दिली होती. परंतु, ते बर्‍याच दिवसांनी लागू करण्यात आले होते. यापूर्वी 2012 मध्ये वेतनवाढ झाली होती. एलआयसीमध्ये दर पाच वर्षांनी सॅलरीमध्ये वाढ करण्यात येते. परंतु, यावेळी हा निर्णय खूप उशीरा घेण्यात आला.

बँकिंग क्षेत्रात पुन्हा मागणी वाढेल
एलआयसीनंतर आता बँक युनियन ही आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मागणी करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार बँक युनियन यासंदर्भात भारतीय बँक असोसिएशनशी बोलण्याच्या तयारीत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग संघटनांची मागणी प्रलंबित आहे. बँका सध्या सोमवार ते शुक्रवार आणि पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी कार्यरत आहेत. सोबतच, कोरोनाच्या काळात बँकिंग कार्यांची वेळ कमी केली गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...