आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा 2.95 पट सब्सक्राइब झाला आहे. जर तुम्ही देखील IPO साठी अप्लाय केला असेल आणि तुमच्या मनात IPO मध्ये शेअर्सचे वाटप झाले आहे की नाही असा प्रश्न असेल. तर त्यासाठी 12 मे पर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही बीएसईच्या वेबसाइटवरून स्थिती तपासू शकता.
शेअर्सचे वाटप 12-13 मे रोजी
LIC चा IPO गुंतवणुकीसाठी 9 मे पर्यंत खुला आहे. यानंतर 12 मे रोजी शेअर्सचे वाटप होईल. म्हणजे 12 मे पर्यंत तुम्हाला कळेल की IPO मध्ये शेअर्स मिळाले आहेत की नाही. यानंतर, LIC चा IPO 17 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल.
अशा प्रकारे तपासा शेअर्स मिळाले आहेत का ?
डिमॅटमध्ये शेअर्स कधी येतील?
LIC च्या IPO गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यातील शेअर्स 16 मे पर्यंत जमा केले जातील. LIC चे शेअर्स 17 मे पर्यंत शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतील आणि त्यामध्ये ट्रेडिंग सुरु होईल. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, शेअर्स इश्यू किमतीपेक्षा जास्त प्रीमियमवर सूचीबद्ध होऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.