आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठी विमा कंपनी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अर्थात एलआयसीने अदानी समूहासोबत अन्य 36 कंपन्यांमध्ये गुतंवणूक केली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. त्यामुळे एलआयसी कंपनीला देखील फटका बसत आहे.
LIC फक्त विमा कंपनीच नाही, शेअर बाजारातील गुंतवणूक संस्था
एलआयसी ही केवळ भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी नाही. तर भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार देखील आहे. अदानी समूहाचे शेअर्स घसरल्यानंतर एलआयसीला फटका बसला. त्यामुळे एलआयसीच्या शेअर्सची मूल्यांकन निम्म्यावर आले. परंतू केवळ अदानी कंपनीच्या नुकसानीमुळे एलआयसीला तोटा होतो असे नाही. तर अशा एकूण तब्बल 36 कंपन्या आहेत. ज्यामध्ये एलआयसीने पैसा गुंतवलेला आहे. त्यातून देखील एलआयसी विमा कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे.
36 कंपन्यांत LICचा सहभाग आहे. ज्यांच्या शेअर्सची किंमत 6 महिन्यांत 20 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तथापि, शेअरच्या किमतींची अस्थिरता बाह्य घटकांवर देखील अवलंबून असू शकते. परंतु काही स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे मत आहे की, एलआयसीच्या गुंतवणुकीचा या अल्प कालावधीचा विचार केला जाऊ नये. कारण एलआयसी दीर्घकाळीन गुंतवणूकदार आहे. एलआयसी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक नामांकित कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणूक करित आहे.
Ace Equityच्या आकडेवारीवरून 58% मूल्य घटले
'अॅसे एक्विटी'च्या आकडेवारीवरून समोर आले की, LIC चे अदानी समूहातील कंपन्यांसह इतर अनेक कंपन्यांचे शेअर मूल्य गेल्या 6 महिन्यांत 58 टक्क्यांपर्यंत कमी झाले. यामध्ये फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स, पिरामल एंटरप्रायजेस, ओमॅक्स, इंडस टॉवर्स, लॉरस लॅब्स, जेट एअरवेज (इंडिया), सनटेक रियल्टी, बॉम्बे डाईंग, GTL इन्फ्रास्ट्रक्चर, अरबिंदो फार्मा आणि जेपी इन्फ्राटेक यांचा समावेश आहे.
अदानी समूहाच्या या कंपन्यात गुंतवणूक
एलआयसीने अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि इकॉनॉमिक झोन आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. गत 6 महिन्यांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर अदानी समूहाच्या या सर्व कंपन्या एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक तोट्यात आहेत. एलआयसीकडे अदानी पोर्ट्समध्ये 9.14 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 %, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 %, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 % आणि अदानी ग्रीन एनर्जीत 1.28% सहभाग आहे.
भारतात यावरून राजकारण तापले
या प्रकरणाने आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संसदेत सातत्याने आवाज उठवला जात आहे. अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या एलआयसी कंपनीची देखील चौकशी केली जावी. अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दुसरीकडे अन्य किती ठिकाणी एलआयसीने गुंतवणूक केली याची देखील संपूर्ण सखोल चौकशीची मागणी होवू लागली आहे.
एलआयसीची 10 सर्वात मोठ्या कंपन्यांत गुंतवणूक
LIC कंपनीने 10 सर्वात मोठ्या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. IDBI (49.24 %), LIC हाउसिंग फायनान्स (45.24 % ), स्टँडर्ड बॅटरीज (19.99%), मॉडेला वूलन्स (17.31 %), ITC (15.29 %), NMDC (13.67 %), महानगर टेलिफोन 13, ग्लोस्टर 12%,लार्सन अँड टुब्रो (12.50 टक्के) आणि सिम्प्लेक्स रियल्टी (12.38 टक्के), विशेष बाब म्हणजे वरील दहा कंपन्यांपैकी 7% कंपन्यांचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत मजबूत झाले आहेत. पाच कंपन्यांचे शेअर्सही दुहेरी अंकात वधारले आहेत.
10 दिवसात 30,000 कोटी गमावले
हे ही वाचा
दिव्य मराठी एक्सप्लेनर अदानींच्या JPC चौकशीवर विरोधक ठाम: यामुळे केंद्र सरकार 3 वेळा उलथले
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये समजून घ्या की, आर्थिक घोटाळ्यांसाठी जेपीसी कधी आणि कशी स्थापन झाली आणि त्याचा काय परिणाम झाला? जेपीसी म्हणजे काय आणि त्या माध्यमातूनच चौकशी व्हावी यासाठी विरोधक का अडून आहेत? - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.