आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • LIC IPA: Applications Invited From Financial Advisors, Likely To Be The Highest IPA In The Indian Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोर्केट लिस्टिंग:एलआयसी आयपीओ : आर्थिक सल्लागारांकडून मागवले अर्ज, भारतीय बाजारपेठेतील सर्वात माेठा आयपीओ ठरण्याची शक्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्केट लिस्टिंग एलआयसीच्या आयपीओसाठी दोन प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर नियुक्त करू इच्छिते सरकार
  • अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्र्यांनी हिस्सेदारी विकण्याचे सूतोवाच केले होते
  • सरकारचे २.१० लाख काेटींचे लक्ष्य

केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या देशातील सर्वात माेठ्या विमा कंपनीची निर्गुंतवणूक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीआे) सरकारला सल्ला देण्यासाठी आर्थिक मंत्रालयाने सल्लागार कंपन्या, इन्व्हेस्टमेंट बँकर व वित्तीय संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. या आयपीआेच्या सुरुवातीच्या प्रक्रियेसाठी सरकारने डिपार्टमेंट आॅफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटच्या (दीपम) मदतीने दाेन आयपीआेपूर्व व्यवहार सल्लागार नियुक्त करण्याचा विचार केला आहे.

अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात रिक्वेस्ट फाॅर प्रपाेझल (आरएफपी) जाहीर केला आहे. इच्छुक कंपन्या १३ जुलैपर्यंत आपल्या निविदा सादर करू शकतात. या निविदा १४ जुलै राेजी दीपमकडून उघडल्या जातील. व्यवहाराचे स्वरूप, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राेड शाे आयाेजित करणे, कमाल मूल्य मिळवून देण्यासाठी उपाययाेजना आदी विविध गाेष्टींसाठी सल्ला व मदत करेल.

बाेलीसाठी किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक

या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत एलआयसीची स्थानिक बाजारात नाेंदणी करण्याचा सरकारचा विचार आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयपीआेच्या माध्यमातून एलआयसीमधील सरकारच्या भांडवली हिश्श्याची विक्री करण्याची घाेषणा केली हाेती. सरकारने या वर्षासाठी २.१० लाख काेटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. एलआयसीच्या आयपीआेतून चांगला निधी उभारण्याचा सरकारचा विचार आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत सार्वजनिक कंपन्यांमधील भांडवली हिश्श्याची विक्री हाेऊ शकलेली नाहीे.

सल्लागार म्हणून बाेली लावणाऱ्या कंपनीकडे आयपीआे, धाेरणात्मक निर्गुंतवणूक, धाेरणात्मक विक्री, खासगी इक्विटी गुंतवणूक व्यवहार यातील कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे असेल. सल्लागार कंपन्या प्रस्तावित आयपीओच्या सुरुवातीच्या बाबींची खात्री करतील आणि आयपीआेची कार्यपद्धती व वेळ याबाबत सल्ला देतील असे मंत्रालयाने म्हटले आहे. आरएफपीनुसार बाेली लावणाऱ्यांकडे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंतच्या कालावधीत ५ हजार काेटी वा त्यापेक्षा जास्तीच्या आयपीआेचा अनुभव गरजेचा आहे. या कालावधीत त्यांनी १५,००० काेटी रुपये वा त्यापेक्षा जास्त भांडवल बाजार व्यवहाराचे व्यवस्थापन केलेले महत्त्वाचे असेल.

बातम्या आणखी आहेत...