आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) या वर्षाच्या मे महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) वर बँकर्स आणि आर्थिक सल्लागारांच्या संपर्कात राहणार असल्याचे सांगितले आहे. RHPहा ऑफर दस्तऐवज आहे जो कंपनी IPO लाँच करण्यापूर्वी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)कडे फाइल करते. हे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP)नंतर दाखल केले जाते.
RHP मध्ये किंमत बँड आणि शेअर्सची संख्या याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सरकारची योजना मार्च 2022 पर्यंत IPO लाँच करण्याची होती, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे हे होऊ शकले नाही. आता बाजार पुन्हा सुधारला असून भावना सकारात्मक असताना सरकारने पुन्हा IPO आणण्याची जय्यद तयारी सुरू केली आहे.
DRHP च्या मंजुरीमुळे शेअर विक्रीचा मार्ग झाला मोकळा
LIC ने 13 फेब्रुवारी रोजी IPO साठी पहिला DRHP दाखल केला होता. मात्र यामध्ये सेबीने मसुदा कागदपत्रांना मंजुरी दिल्याने शेअर्सच्या विक्रीचा मार्ग आता मोकळा करण्यात आला आहे. परंतु, IPO लाँच होण्यास उशीर झाल्यामुळे, DHRP मार्चमध्ये पुन्हा दाखल करावा लागला. जुन्या DRHP ला दिलेल्या मंजुरीनुसार सरकार 12 मे पर्यंत IPO आणू शकते. परंतु नवीन DRHP दाखल केल्यास LIC 12 मे नंतरही IPO आणू शकते.
भारतीय इतिहासातला LIC हा सर्वात मोठा IPO असेल
LIC मधील सुमारे 31.6 कोटी किंवा 5% समभाग विकून सरकारला 60,000 कोटी रुपये उभे करायचे आहे. पण 5% स्टेक विकल्यानंतर हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असेल. दरम्यान कंपनीचे बाजार मूल्य RIL आणि TCS सारख्या शीर्ष कंपन्यांच्या बरोबरीचे असेल. सध्या पेटीएमकडे भारतातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम असेल
डिसेंबरमध्ये LIC ला 234.9 कोटी रुपयांनी झाला नफा
डिसेंबर तिमाहीत LIC चा निव्वळ नफा वाढून 234.9 कोटी झाला आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा फक्त 90 लाख झाला होता. मात्र, पहिल्या वर्षाचा प्रीमियम डिसेंबर 2020 च्या तिमाहीत रु. 7957.37 कोटींवरून रु. 8748.55 कोटी झाला आहे. नूतनीकरण प्रीमियम 56822 कोटी रुपयांपर्यंत वाढला असू, डिसेंबर तिमाहीसाठी एकूण प्रीमियम रु. 97761 कोटी असेल जो एका वर्षापूर्वी रु.97008 कोटी रुपये झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.