आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलन मस्क यांनी टि्वटर सांभाळण्यासाठी नवा सीईओ शोधला आहे. त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. मस्क यांनी सांगितले की, एनबीसी युनिव्हर्सल अॅडव्हरटायझिंग हेड लिंडा याकारिनो यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल.
६० वर्षीय लिंडा टीव्ही आणि सोशल मीडियात जाहिरात वाढवण्यासाठी जगात प्रसिद्ध आहेत. लिंडा एका दशकाहून जास्त काळ जाहिरातीचा प्रभाव मोजण्याची चांगली पद्धती शोधत आहेत. कोणत्याही उद्योगासाठी जाहिरात तंत्रज्ञान, डेटा, मार्केटिंग आणि धोरण बनवण्यात त्यांची चांगली पकड आहे. त्या केवळ मस्क नव्हे तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपन्यांचे मीडिया जाहिरात डील्सना लीड करत होत्या. लिंडा पुढील सहा आठवड्यांत सीईओचा पदभार स्वीकारू शकतात. मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, लिंडा रुजू झाल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष व सीटीओची असेल. भविष्यात टि्वटर उत्पादनांवर दबाव वाढेल, असे मस्क यांना वाटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.