आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये 13 दिवस बँका राहणार बंद:नाताळ, गुरू गोविंदसिंग यांच्या जयंती सुटी, जाणून घ्या- तारखेनिहाय सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षातला डिसेंबर हा सर्वात शेवटचा महिना लवकरच सुरू होणार आहे. या महिन्यात देशभरातील बॅंका जवळपास 13 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुटीच्या कॅलेंडरवरून ही माहिती देण्यात आली आहे. डिसेंबरच्या 31 दिवसांच्या महिन्यात अनेक सण, उत्सवांचा समावेश असल्याने या सुट्या असणार आहेत.

25 डिसेंबरला ख्रिसमस
डिसेंबर महिन्यात विविध राज्ये आणि शहरांमध्ये 3, 12, 19, 26, 29, 30, 31 डिसेंबरला बँकांना सुट्टी असेल, तर 4, 10, 11, 18, 24, 25 तारखेला सुट्टी असेल. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार व्यतिरिक्त, रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. यावेळी ख्रिसमस (25 डिसेंबर) रविवारी आहे.

अशा स्थितीत जर तुम्हाला पुढील महिन्यात बॅंकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्ट्या सोडून तुम्ही बॅंकेत जाऊ शकता. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात तुमच्या राज्यात आणि शहरात बँका कधी बंद राहतील हे जाणून घ्या.

डिसेंबर महिन्यातील बँक सुट्यांची यादी

दिनांकसुटी असण्याचे कारणकुठे बंद राहणार
3सेंट फ्रान्सिस झेवियरचे पर्वपणजी (गोवा)
4रविवारसगळीकडे
दूसरा शनिवारसगळीकडे
रविवारसगळीकडे
12पा-तोगन नेंगमिंजा संगमाशीलॉंग
18रविवारसगळीकडे
19गोवा मुक्तीदिनपणजी (गोवा)
24क्रिसमस पर्व/चवथा शनिवारसगळीकडे
25क्रिसमस पर्व/रविवारसगळीकडे
26क्रिसमस सेलिब्रेशन/लोसूंग/नामसूंगएजवाल, गंगटोक, शिलांग
29गुरू गोविंदसिंग यांची जयंतीचंदीगड
30यू किआंग नांगबाशीलॉंग
31नविन वर्षानिमित्तइजावल

महत्त्वाची सूचना : याशिवाय विविध राज्यांमध्ये विविध कारणांमुळे बँका बंद राहतील. RBI ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिलाँगमध्ये दोन वेळा लांब सुटी
डिसेंबरमध्ये शिलाँगमध्ये 2 लांब सुट्ट्या आहेत. पहिला 10 ते 12 डिसेंबर आणि दुसरा 24 ते 26 डिसेंबर दरम्यान पडेल. त्यामुळे या महिन्यात येथील लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला त्यांच्या वेबसाइटवर बँक हॉलिडे लिस्ट अपडेट करते.

बातम्या आणखी आहेत...