आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 'Ambani' Tops List Of Richest: Hurun Tops List Of Top 10 Billionaires In Global List, Adani's Wealth Also Increased The Most Last Year | Marathi News

श्रीमंताच्या यादीत 'अंबानी'च अव्वल:'हुरून ग्लोबल' यादीत अव्वल 10 मध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय, अदानींच्या संपत्तीत गेल्या वर्षी सर्वाधिक वाढ

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे जगातील अव्वल 10 अब्जाधीशांच्या 2022 च्या हुरुन श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत. रिअल इस्टेट ग्रुप M3M आणि रिसर्च प्लॅटफॉर्म हुरून यांनी संयुक्तरीत्या ही यादी तयार केली आहे. त्याचवेळी, गेल्या एका वर्षात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

अदानींच्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ

यादीनुसार, गेल्या एका वर्षात अदानींच्या संपत्तीत 49 अब्ज डॉलरची (सुमारे 3.7 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. अदानींनी एका वर्षात दर आठवड्याला 6,000 कोटी मिळवले. अक्षय ऊर्जा कंपनी अदानी ग्रीन सूचीबद्ध झाल्यानंतर अदानींची मालमत्ता 2020 मध्ये 17 अब्ज डॉलर वरून 2021 मध्ये सुमारे पाच पटीने वाढून 81 अब्ज डॉलर झाली. अदानी हे अंबानीनंतरचे दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आणि आशियाई आहेत. अंबानींची एकूण संपत्ती 103 अब्ज डॉलर आहे.

जागतिक यादीत अदानी १२व्या क्रमांकावर

अदानींनी वार्षिक आधारावर आपल्या संपत्तीत 153 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली आहे. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत ते 12 व्या क्रमांकावर आहेत, तर अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत. या यादीतील अव्वल 3 अब्जाधीशांमध्ये स्पेसएक्स आणि टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क, अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि LVMH चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नॉल्ट यांचा समावेश आहे.

अव्वल 100 अब्जाधीशांत 3 नवीन भारतीयांची नावे

अव्वल 100 अब्जाधीशांच्या यादीत तीन नवीन भारतीयांचा समावेश झाला आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला 26 अब्ज डॉलर संपत्तीसह 55 व्या, आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मी मित्तल 25 अब्ज डॉलर संपत्तीसह 60व्या स्थानावर आणि डी-मार्टचे संस्थापक आर.के. दमाणी आणि कुटुंब 23 अब्ज डॉलर संपत्तीसह 67 व्या क्रमांकावर आहेत.

'नायका'च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा देखील 7.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह हुरुन ग्लोबल रिच 2022 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...