आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • In The Listing Discount Of The Largest IPO In The Country ?, Rs 20 Fall In The Gray Market

LIC च्या IPO मध्ये तोटा होण्याची शक्यता:देशातील सर्वात मोठ्या IPO ची लिस्टिंग डिस्काउंडमध्ये?, ग्रे मार्केटमध्ये 20 रुपयांची घट

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या LIC च्या IPO ची लिस्टिंग डिस्काउंडमध्ये होण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमध्ये तसे संकेत मिळत आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये, LIC त्याच्या इश्यू किंमत 949 रुपये प्रति शेअर वरून 20 रुपयांच्या सवलतीवर मिळत आहे. म्हणजेच, IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना मिळालेल्या सवलतीच्या दरापेक्षा ते केवळ 25 रुपये जास्त आहे. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा प्रीमियम मंगळवारी 10 रुपयांपर्यंत घसरला आणि बुधवारी तो नकारात्मक झाला.

ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या बहुतेक डीलर्सनी सांगितले की, आयपीओला परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे ग्रे मार्केटच्या धारणेवर परिणाम झाला आहे. बाजारातील अस्थिरता यामध्ये आणखी भर घालत आहे. अनलिस्टेड एरियाचे सहसंस्थापक अभय दोशी म्हणाले की, ‘महागाईच्या चिंतेने धोरण अधिक कडक केले जात असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण इक्विटी बाजारावर होत आहे.’

इश्यू 2.95 पट सब्सक्राइब झाला

एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तथापि, आकर्षक मूल्यांकन असूनही, ते परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले आहे. किरकोळ आणि इतर गुंतवणूकदारांसाठी 4 मे रोजी उघडलेल्या या IPO साठी 9 मे हा शेवटचा दिवस होता. इश्यू 2.95 पट सब्सक्राइब झाला आहे. 16.2 कोटी समभागांच्या तुलनेत 47.77 कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे.

पॉलिसीधारकांसाठी राखीव 6.10 पट सब्सक्राइब

पॉलिसीधारकांसाठी राखीव भाग 6.10 पट, कर्मचारी 4.39 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 1.99 पटीने सब्सक्राइब झाला आहे. QIB च्या वाटप केलेल्या कोट्याला 2.83 पट बोली प्राप्त झाली आहे, तर NII च्या भागिदारीही 2.91 पट सब्सक्राइब झाला आहे. शेअर्स 17 मे रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध केले जाणार आहेत. बहुतेक बाजार विश्लेषकांनी IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

17 मे रोजी सूचीबद्ध

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले की LIC समभागांचे वाटप 12 मे रोजी होईल, तर सूची मंगळवारी, 17 मे रोजी होईल. यापूर्वी एलआयसीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 रुपयांच्या प्रीमियमवर चालत होते. आता ते 20 रुपयांच्या सवलतीत आले आहेत. ही सूट आणखी वाढू शकते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...