आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Loan Demand At 9 year Record High, At Which Point FD Rates Will Rise | Marathi News

एफडीचे दर होऊ शकतात कमी:9 वर्षांच्या विक्रमी पातळीवर कर्जाची मागणी, अशा वेळी एफडीचे दर वाढणार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांच्या कर्जाची मागणी ९ वर्षांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल, मात्र डिपॉझिट त्या वेगाने वाढत नाही. त्यामुळे बँकांकडे निधीची कमतरता आहे. अशावेळी ठेवींच्या व्याजदरात वाढ निश्चित मानली जाते. पुढील एका वर्षात ठेवींच्या दरांमध्ये १.७५-२.२५% वाढ होऊ शकते. रिझर्व्ह बँकांच्या आकड्यांनुसार, १ एप्रिलपासून चालू आर्थिक वर्षात २६ ऑगस्टपर्यंत बँकांनी ५.६६ लाख रुपये वाटप केले. आर्थिक वर्षाच्या २६ ऑगस्टपर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जापैकी ४.८ जास्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये याबाबतीत ०.५% घसरण झाली होती. एवढेच नव्हे तर ते कॅलेंडर वर्ष २०२१ मध्ये २६ ऑगस्टपर्यंत वितरित केलेल्या कर्जापेक्षा १५.५% जास्त.

२०१८च्या पातळीवर येऊ शकतात ठेव दर
३ वर्षांच्या एफडीचा दर २०१८च्या पातळीवर ७.२५-८.५%कडे वळत आहे. सध्या हे दर ५.५-६.२५% आहेत. एका बँकरने सांगितले, बँकांनी रेपो दर वाढीच्या अनुषंगाने कर्जाचे दर वाढवले, तर ठेवींच्या दरात वाढ होण्याचा वेग वाढला पाहिजे.

मार्च २०२३ पर्यंत ०.५७% वाढेल रेपो रेट
सध्या बँका विचार करत आहेत की, मार्च २०२३पर्यंत रेपो रेटमध्ये आणि ०.७५% ची वाढ होऊ शकते. यानंतरच त्यांना रेपो रेट कमी होण्याची अपेक्षा आहे. एका खासगी बँकरने सांगितले, पुढील वर्षी जानेवारीपासून ठेव दरांमध्ये तीव्र वाढ होईल.

रेपो आणि डिपाॅझिटचे कमी होऊ लागले रेट्स
या आर्थिक वर्षात ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत डिपॉझिट रेट्स फक्त ०.३०-०.६०%च वाढले, तर रेपो
रेट १.४०% वाढून ५.४% झाले.

अलीकडच्या काही आठवड्यांत येस बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, युनियन बँकेने एफडी रेट्स ०.३०-०.५०% वाढवले.

देशातील रेपो दर आणि ठेवी दरांमधील अंतर हळूहळू कमी होत चालले आहे, जुलैमध्ये ०.८०-१.०% वरून आता ०.६-०.८% वर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...