आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Loans Up To Rs 1.25 Lakh To 25 Lakh Small Entrepreneurs At Affordable Interest Rates; News And Live Updates

नवे मदत पॅकेज:25 लाख छोट्या उद्योजकांना विनाहमी स्वस्त व्याजदरात 1.25 लाखापर्यंत कर्ज

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या लाटेचा झटका सोसणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या उद्योजकांसाठी सोमवारी नवे मदत पॅकेज जाहीर केले. यामध्ये गेल्या वर्षी जाहीर इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीमसाठी(ईसीएलजीएस) फंडिंग दीडपट वाढवली आहे. दुसरीकडे, कोविडमुळे परिणाम झालेल्या क्षेत्रासाठी स्वतंत्र १.१० लाख कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा केली आहे. छोट्या उद्याेजकांसाठीही ७५०० कोटींच्या योजनेस मंजुरी दिली आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीमची घोषणा केली आहे.

या अंतर्गत कर्मशियल बँकांद्वारे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटला दिलेल्या व सध्याच्या कर्जासाठी हमी दिली जाईल. या अंतर्गत २५ लाख लोकांना फायदा होऊ शकतो. यात छोटे उद्योजक १.२५ लाखापर्यंतचे कर्ज घेऊ शकतील. याचे व्याज दर मायक्रो फायनान्सकडून नव्या कर्जावर घेतलेल्या व्याजदरापेक्षा २% कमी असेल.

२-३ वर्षांत परिणाम दिसेल
संकटग्रस्त क्षेत्रांसाठी हे मदत पॅकेज आहे. अनेक विकसित देशांनी मागणी वाढवण्यासाठी थेट इन्कम सपोर्ट दिला. मात्र, आमची तेवढी क्षमता नाही. या घोषणांचा परिणाम दिसायला २-३ वर्षे लागतील. डी.के. जोशी, मुख्य अर्थतज्ज्ञ, क्रिसिल

मदत पॅकेजशी संबंधित विशेष बाबी

  • क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत नवी योजना वा सध्याच्या योजनेच्या विस्तारासाठी मिळेल हमी मुक्त कर्ज
  • फेब्रु. २०२० च्या लोन आऊटस्टँडिंगसाठी २०% रकमेसमान कर्ज घेऊ शकतील व्यावसायिक ईसीएलजीएसमध्ये
  • खाते एनपीए झालेल्यांना ईसीएलजीएस वा लोन गॅरंटीचा लाभ मिळणार नाही.
  • असे व्यावसायिक ज्यांनी एकदा ईसीएलजीएस योजनेचा लाभ घेतला आहे, ते पुन्हा फायदा घेऊ शकणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...