आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Local Lockdowns Reduced Demand For Clothing, Halving Half Production In Factories

टेक्सटाइल हबमध्ये उत्पादन घटले:स्थानिक लॉकडाऊनमुळे कपड्यांची मागणी आकसली, कारखान्यांत निम्म्यावर उत्पादन

एजाज शेख| सुरतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाचे 70 % सिंथेटिक कापड तयार करणाऱ्या टेक्सटाइल हब सुरतमधून
  • आधी ३ कोटी मीटर कापडाचे रोज उत्पादन होत होते, आता १.५ कोटी मीटर होत आहे

कोरोनाला विसरत दोन महिन्यांपूर्वी सुरतचा कापड व्यवसाय खूप तेजीने आगेकूच करत होता. मात्र, कापड व्यवसाय पुन्हा एकदा कोरोनाच्या तडाख्यात सापडला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि बिहारसह देशातील ९० टक्के भागांत स्थानिक लॉकडाऊन आहे. यामुळे कोणत्याही राज्यातून कपड्याची मागणी येत नाही. परिणामी १५ मार्चला सुरतहून ४०० ट्रक माल जात हाेता, आता तो शून्यावर आला आहे. यामुळे सुरतचे रोज १५० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

सुरत टेक्सटाइल गुड्स ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष युवराज देसले यांनी सांगितले की, हळूहळू बहुतांश राज्यांत लॉकडाऊन लागला. छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि बिहार पूर्णपणे ठप्प आहे. अशा स्थितीत येथे कपड्याची मागणी होत आहे ना-ही येथे कपडे पाठवले जात आहेत. देशाचे ७०% सिंथेटिक कापड तयार करणाऱ्या सुरतच्या व्हिव्हिंग-निटिंग उद्योगात ७ लाख, प्रोसेस हाऊसमध्ये ३ लाख, एम्ब्रॉयडरीमध्ये अडीच लाख आणि कापड बाजारपेठेत अडीच लाख मजूर काम करतात. यापैकी निम्मे मजूर सात एप्रिलनंतर गावी ओडिशा, यूपी-बिहार, बंगालला परतले आहेत. मात्र, स्थलांतरामागे लॉकडाऊनशिवाय लग्न समारंभ, निवडणूक आणि शेतीची कामे मानले जात आहे. द. गुजरात टेक्सटाइल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितू वखारिया यांनी जॉबवर्क १०-१५% राहिल्याचे सांगितले.

बाहेरून खरेदीदार येत नाहीत
संपूर्ण वर्षाचा व्यवसाय मार्च आणि एप्रिलमध्ये होतो. या वेळी कोरोनामुळे चिंता वाढली आहे. बाहेरून व्यापारी येत नाहीत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम पाहायला मिळत आहे. दिनेश कटारिया, कापड व्यापारी

सध्याच्या स्थितीमुळे ५०% कामगार कापड बाजारातून स्थलांतर करत आहेत. लवकरच स्थिती न सुधारल्यास कामगारांना अडवणे कठीण होईल. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये व्यापाऱ्यांना झालेल्या नुकसानीमुळे फटका बसू शकतो. मनोज अग्रवाल, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सुरत टेक्सटाइल ट्रेडर्स असोसिएशन

  • मूल्याच्या १ लाख साड्या, कुर्ती आणि ड्रेस मटेरियल विकले आहे.
  • बाजारपेठ उघडल्यावर त्वरित मागणी आल्यास विकण्यासाठी कपडे असायला हवेत.
  • जे मजूर गेले नाहीत त्यांच्याकडे कामाची कमतरता नसली पाहिजे, अन्यथा तेही परत जातील.
  • मशीन बंद होऊ नये यासाठी एवढे उत्पादन आवश्यक आहे. मशीन बंद राहिल्यास त्यात अडचणी येतात.
बातम्या आणखी आहेत...