आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगला परतावा:लॉकडाऊन : 10 रुपयांखालील 5 शेअर्सचा 900% रिटर्न

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएसईचा सेन्सेक्स कोरोना काळात आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून ३२% वधारला
  • बिर्ला टायरमध्ये सलग ३७ ट्रेडिंग सत्रांपासून अपर सर्किट(५%) लागत आहे
  • सेन्सेक्स मिड कॅप इंडेक्स ३१% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स ३७% वाढला

या वर्षी फेब्रुवारीत भारतीय शेअर बाजार आपल्या आतापर्यंतच्या उच्च पातळीवर(४० हजारांवर) व्यवसाय करत होता. यानंतर बाजारावर कोरोनाचे ग्रहण लागले आणि २३ मार्चला सेन्सेक्स डुबकी घेत ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २५,९८१ वर आला. संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक उत्पादन ठप्प होते आणि शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण होते. यादरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात औषधी क्षेत्रासह अनेक समभागांनी बंपर रिटर्न दिला.

१० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या जवळपास ४० समभागांनी यादरम्यान ५० वरून ९००% पर्यंत रिटर्न दिला. मात्र, यापैकी बहुतांश शेअर्स हे सर्वात जोखमीचे आहेत. त्यांच्याकडे रोकड व बाजार भांडवल कमी होते आणि अस्थिरता खूप जास्त असते. यासोबत पैसे बुडण्याची शक्यता असते. २४ मार्चपासून शुक्रवार म्हणजे १२ जूनला बाजार बंद होईपर्यंत बिर्ला टायरने ९०७% चा मोठा परतावा दिला आहे. बिर्ला टायर बी.के. बिर्ला ग्रुपची कंपनी असून ती ऑटो टायर आणि रबर उत्पादन व्यवसायात आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या आधी या समभागात सलग ३७ ट्रेडिंग सेशनमध्ये अपर सर्किट(५%) लागले होते. १ फेब्रुवारीपासून या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू होते, त्या दिवशी हा ६.४५ रुपयांवर बंद झाला होता. कंपन्यांचे चांगले भविष्य आणि कमी शेअर किमतीमुळे यामध्ये देशांतर्गतसोबत विदेशी गुंतवणूकदारही पैसा लावत आहे.

मल्टिनॅशनल मेडिकल टेक्नॉलॉजी ग्रुप ओप्टो सर्किट्स २०११ मध्ये २०० वर व्यवसाय करत होते. यानंतर कंपनीचे तारे अंधारात बुडाले आणि २०१५ येताच शेअरची किंमत २० रुपयांच्या खाली आली, जी २०२० मध्ये ३ रुपयांपेक्षा खाली गेली. आता कोरोनाने यामध्ये पुन्हा प्राण फुंकले आहेत. याच पद्धतीने सिटी प्रोझेन, अॅडूकॉम सोल्युशन, ऊर्जा ग्लोबलसारख्या कंपन्यांनीही १००% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. याचे बाजार भांडवल १०० कोटींवर आहे.

कमकुवत फंडामेंटलच्या या शेअर्समध्ये गुंतवणूक टाळलेली बरी
या कमकुवत शेअर्समध्ये तेजी ही वाऱ्याची झुळूक आहे. हे सर्व जोखमीचे समभाग आहेत. क्वचित प्रसंगी योग्य ठरेल. मात्र या समभागांत पैसा बुडण्याची पूर्ण खात्री असते. यातील बहुतांश कंपन्यांच्या फंडामेटलमध्ये असा कोणता मोठा बदल झाला नाही. तात्कालिक वाढ पाहता अशा कमकुवत फंडामेंटलच्या समभागांत गुंतवणूक करणे टाळा. कोरोनात बळकट फंडामेंटलच्या कंपन्यांत गुंतवणूक करा. - उमेश मेहता, रिसर्च हेड, सॅमको सिक्युरिटीज

सोमवारी बीएसईमध्ये याचा समभाग ३१.३० रुपयांवर झाला बंद
शेअर २४ मार्च १२ जून रिटर्न(%)
बिर्ला टायर 2.80 28.20 907%
ओप्टो सर्किट्स 1.55 9.67 523%
आलोक इंडस्ट्रीज 5.05 29.85 491%
रुची इन्फ्रास्ट्रक्चर 2.10 9.22 339%
जेएमटी ऑटो 0.95 3.70 289%

पीपीई किटमुळे आलोक इंडस्ट्रीजमध्ये जवळपास ५०० टक्क्यांची वाढ

आलोक इंडस्ट्रीज प्रामुख्याने वस्त्रोद्योग उत्पादक कंपनी आहे. १ जानेवारी १९९५ रोजी १०९ रु.वर व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीजचे वाईट दिवस सुरू झाले आणि कंपनी कर्जात बुडाली. शेअर किंमत १० रुपयांवर आली, जी पुढे जाऊन २०१९ मध्ये ३ रुपयांवर आली. कोरोना काळात कंपनीने पीपीई किट तयार करण्यास सुरुवात केली आणि कंपनीच्या समभागांमध्ये सलग अपर सर्किट लागत आहे. नोट : या सर्व कंपन्या १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवलाच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...