आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Lockdown Effect | The Service Sector, Which Contributes The Most To GDP, Is At A Standstill, With A PMI Of 5

लॉकडाउन इफेक्ट:जीडीपीत सर्वाधिक योगदान देणारे सेवा क्षेत्र ठप्प, पीएमआय ५.४ वर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पीएमआय ५० वर याचा अर्थ वृद्धी आणि खालील आकडा मंदी दर्शवतो
  • मार्चमध्ये पीएमआय ४९.३, कंपोझिट पीएमआयमध्येही घसरण

कोरोना विषाणू महारोगराईमुळे सुरू टाळेबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या सेवा क्षेत्रावर खूप वाईट परिणाम झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्रातील हालचालीत एप्रिल महिन्यात मोठी घसरण नोंदली आहे. आयएचएस मार्केट इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स एप्रिल २०२० मध्ये मोठ्या घसरणीसह ५.४ वर आला आहे. मार्चमध्ये हा ४९.३ वर होता. पीएमआयमध्ये ५० पेक्षा जास्त आकडा वृद्धी आणि ५० पेक्षा खालील अाकडा मंदीचा दाखवतो. निर्देशांकाची ताजी स्थिती सांगते की, डिसेंबर २००५ मध्ये व्यावसायिक उत्पादनाची नोंद ठेवण्याची सुरुवात केल्यानंतर सेवा क्षेत्राचे उत्पादन घसरून आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आले.

आयएचएस मार्केटचे अर्थतज्ञ जो. हाएस यांनी सांगितले की, निर्देशांकात ४० पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीतूून लक्षात येते की, कठोर टाळेबंदीमुळे सेवा क्षेत्र पूर्ण ठप्प आहे. यादरम्यान कंपोझिट पीएमआय आऊटपुट इंडेक्सही ५०.६ वरून घसरून ७.२ वर आला आहे. यातून समग्र आर्थिक उत्पादनात डिसेंबर २००५ मध्ये आकड्यांची नोंद ठेवण्याची सुरुवात केल्यानंतर आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाल्याचे दिसते. कंपोझिट पीएमआय आऊटपुट इंडेक्स सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही क्षेत्रांचे उत्पादन दाखवते. आंतरराष्ट्रीय विक्री प्रकरणात सर्वेक्षणाच्या सर्व पॅनल्सने घसरणीचा उल्लेख केला आहे.

हिस्सेदारी: भारताच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान सुमारे ५५%(२०१८-१९), यामध्ये ३३% लोकसंख्येस रोजगार

मागणी घटल्याने किमतीत आली घसरण

किमतीच्या आघाडीवरील सर्वेक्षणात म्हटले की, मार्चच्या तुलनेत इनपुट आणि आऊटपुट किमतीत घसरण आली. असे असले तरी सेवा क्षेत्राच्या तुलनेत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात किमतीत घसरण जास्त झाली. येणाऱ्या महिन्यांत व्यावसायिक वातावरण आणि घसरणीचे संकेत मिळाले आहेत. भविष्यात उत्पादनाचा अंदाज डिसेंबर २०१५ नंतर महिना-दर-महिना विक्रमी घसरण नोंदली आहे.

एप्रिल : कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली

रोजगाराबाबतच्या सर्वेक्षणात नमूद केले की, व्यावसायिक गरजांतील घसरणीमुळे सेवा क्षेत्रातील काही कंपन्यांनी एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली. कर्मचाऱ्यांची कपात विक्रमी पातळीवर झाली, मात्र जवळपास ९०% पॅनल्सनी सांगितले की, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल आला नाही. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटीवर पाठवले आहे.

गेल्या महिन्यात १५% ची अर्थव्यवस्थेत घसरण

हाएस यांनी सांगितले की, जीडीपी आकड्याच्या ऐतिहासिक तुलनेतून लक्षात येते की, एप्रिलमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत वर्षाच्या आधारावर १५ टक्क्यांची घसरण आली आहे. यातून स्पष्ट होते की, कोविड-१९ महारोगराईचा भारतावर खूप खोलवर आणि व्यापक परिणाम झाला आहे. टाळेबंदीत हळूहळू दिल्या जाणाऱ्या शिथिलतेमुळे स्थितीत सुधारणा सुरू होईल,अशी आशा आहे.

एप्रिल २००० नंतर सर्वात जास्त थेट विदेशी गुंतवणूक सेवा क्षेत्रात

> भारतात एप्रिल २००० पासून डिसेंबर २०१९ पर्यंत सर्वात जास्त एफडीआय सेवा क्षेत्रात आले आहे. या दरम्यान ८०६७ कोटी डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक आली आहे.

> भारताच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे योगदान सुमारे ५५%(२०१८-१९) आहे. भारताच्या सुमारे ३३% काम करणाऱ्या लोकसंख्येस सेवा क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.

> ट्रेड, हॉटेल, रेस्तराँ, ट्रान्स्पोर्ट, स्टोअरेज, कम्युनिकेशन, फायनान्स, इन्शुरन्स, बिझनेस सर्व्हिसेस, हेल्थ केअर, आयटी सर्व्हिसेस आदी क्षेत्र या कक्षेत येतात.

बातम्या आणखी आहेत...