आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Lockdown Hits 25,000 Crore Loss To Airline Services , Will Take 2 Years To Recover: Crisil

हवाई क्षेत्र:लाॅकडाऊनमुळे हवाई क्षेत्राला २५,००० काेटींचा फटका, सावरायला लागतील २ वर्षे : क्रिसील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • विमान सेवा कंपन्यांना १७-१८ हजार काेटी आणि विमानतळ चालकांना ५ हजार काेटींचे हाेणार नुकसान

काेराेना व्हायरस महामारीमुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे देशातल्या हवाई उद्याेगाला या आर्थिक वर्षात जवळपास २५ हजार काेटी रुपयांचे नुकसान हाेऊ शकते. या उद्याेगाला पूर्वपदावर येण्यासाठी दाेन वर्षे लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती क्रिसील या पतमानांकन संस्थेच्या ताज्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. लाॅकडाऊनचा सर्वाधिक परिणाम विमान सेवा कंपन्यांवर हाेणार आहे. या कंपन्यांना १७-१८ हजार काेटी रुपयांचा महसुली ताेटा हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विमानतळावरील ऊटलेट्सला १,७०० ते १,८०० काेटी रुपयांचा ताेटा हाेऊ शकताे.

काेराेनाने महामार्ग विकासकांना ३,७०० काेटींचे नुकसान

देशाच्या महामार्ग विकासावर झालेल्या कोराेनाच्या परिणामाच्या संदर्भातही क्रिसीलने एक अहवाल प्रसिद्ध केेला आहे. त्यानुसार मार्च ते जूनपर्यंत महामार्ग विकासकांना ३,७०० काेटी रुपयांचा टाेल महसुली ताेटा हाेणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २,२०० काेटी रुपयांचा ताेटा हाेणार आहे. परंतु, काेराेना प्रकाेप संपल्यानंतर रस्ते व महामार्ग क्षेत्राचा वेगाने विकास हाेईल. अहवालानुसार लाॅकडाऊनमुळे देशभरतील वाहतूक ठप्प आहे. परंतु, मालवाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर या क्षेत्रात वेगाने सुधारणा हाेईल.

हवाई क्षेत्राला मिळू शकताे दिलासा, इंधन किमतीत वाढ नकाे

क्रिसिलने सरकारकडे विमान क्षेत्राला आर्थिक मदत, विमान इंधनाचा जीएसटीत समावेश करून त्याचे दर कमी करणे, विमान इंधनाची रक्कम फेडण्यासाठी जास्त कालावधी देणे, तसेच विमानतळ शुल्क माफ करणे अशी मागणी क्रिसीलने केली आहे. विमान इंधनावरील शुल्क वाढवले नाही तर ही माेठी गाेष्ट ठरेल, असे पद्मनाभन म्हणालेे. सध्या जगभरातील ९० टक्के उड्डाणे बंद आहेत.

कंपन्यांच्या विलीनीकरण, अधिग्रहणांमध्ये हाेऊ शकते वाढ

पद्मनाभन म्हणाले, काेराेनाचा प्रकाेप संपल्यानंतर पूर्ण हवाई उद्याेगात विविध प्रकारचा रचनात्मक बदल हाेऊ शकताे. काही विमान कंपन्यांमध्ये विलीनीकरण आणि अधिग्रहण हाेण्याचीही शक्यता आहे. सध्या विमाना कंपन्या आपल्या ताफ्याचा विस्तार करणार नाहीत. देशातील विमान कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर दिलेल्या विमान खरेदीच्या आॅर्डरपैकी काही रद्द हाेऊ शकतात किंवा कमीत कमी काळासाठी स्थगित केल्या जाऊ शकतात.

विमान सेवा बंद असल्याने जेट एअरवेजचा वृद्धी दर २.५ % वर

क्रिसीलच्या लाॅजिस्टिक विभागाचे संचालक जगननाायण पद्मनाभन म्हणाले, जेट एअरवेज बंद असल्याने गेल्या वर्षात स्थानिक हवाई उद्याेगाचा वृद्धीदर घटून २.५ %वर आला. हा उद्याेग उभारी घेण्याचा प्रयत्नात असतानाच काेराेना मुळे पूर्णत: ठप्प झाला. काेराना आधी विमान कंपन्यांच्या उड्डाणांमध्ये आसनांचे प्रमाण ९० % हाेते. काेराेनानंतर हे प्रमाण ५० % राहील. पूर्वपदावर येण्यासाठी दाेन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...