आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढते संकट:सायबर घोटाळ्यात 25,000 कोटींचे नुकसान; फसवणुकीत 28 टक्के वाढ

मंदार दवे|अहमदाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील 15 टक्क्यांवर कॉर्पोरेट-बिझनेस सायबर घोटाळ्याच्या जाळ्यात

कोरोना काळात डिजिटल व्यवहार वाढण्यासोबत अशा देवाणघेवाणीच्या फसवणूक प्रकरणांतही २८% वाढ झाली आहे. सायबर घोटाळ्यांच्या घटनांमुळे देशात दरवर्षी सरासरी २०-२५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या वित्त वर्षात देशात सायबर घोटाळ्यामुळे सर्वात जास्त ६-७ हजार कोटी रुपयांचे नुकसान दिल्लीला सोसावे लागले आहे. यानंतर मुंबई (५-६ हजार कोटी) आणि गुजरात (४-५ हजार कोटी) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ग्लोबल इन्फर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियनच्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, गुप्तचर आधारित व्यवसायाच्या देवाणघेवाणीत सर्वात जास्त सायबर घोटाळे झाले. यासोबत ४०,००० ग्लोबल वेबसाइट्स, मोबाइल अॅप्समध्येही डिजिटल देवाणघेवाणीत कंपन्यांना सायबर घोटाळ्याचा सामना करावा लागला आहे. भारतात सर्वाधिक फटका लॉजिस्टिक क्षेत्राला बसला.

लार्ज स्केलमधील ५०%वर कंपन्यांना सायबर सुरक्षा
लार्ज स्केलच्या ५०% हून अधिक कंपन्या सायबर सुरक्षेची मदत घेतात. स्मॉल स्केल श्रेणीत १५-२०% कंपन्या असे करत आहेत. कॉर्पाेरेट्समध्ये जोखीम खरेदी श्रेणी , डेटा चोरीत. - भावेश उपाध्याय, संस्थापक, एंटरप्रायझिंग इंडियन
देशात सायबर घोटाळ्यामुळे दिल्लीत सर्वाधिक नुकसान

राज्य नुकसान(रु.)

  • दिल्ली 6-7 हजार कोटी
  • मुंबई 5-6 हजार कोटी
  • गुजरात 4-5 हजार कोटी
  • राजस्थान 3-4 हजार कोटी
  • यूपी 3-4 हजार कोटी
  • एमपी 2.5-3 हजार कोटी

कोरोना काळात ऑनलाइन घोटाळे

तज्ज्ञांनुसार, कोरोना संकट आणि याच्याशी संबंधित निर्बंधामुळे लोकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. या वृद्धीसोबत सायबर घोटाळे अनेक पटीने वाढले. कोरोनाआधी एकूण सायबर घोटाळ्यांत ऑनलाइन खरेदीत घोटाळ्यांची हिस्सेदारी ५-७ टक्के होती. ती आता वाढून सुमारे २०% झाली आहे.

या क्षेत्रांत फसवणूक...

लाॅजिस्टिक क्षेत्रात जास्त निशाणा होतो.ऑर्डरमध्ये बदल करून बनावट ऑर्डरमध्ये रूपांतर केले जाते.

फार्मा क्षेत्रालाही अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचा जास्त त्रास आहे. औषधांच्या पेटंट चोरीची प्रकरणे वाढली आहेत.

मॅन्यु. कंपन्यांना प्रॉडक्ट पद्धती चोरीसोबत गुणवत्तेत बदलासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडियावर विविध उत्पादनांवर ८०-९०% पर्यंत सुटीची लालूच देऊन घोटाळा करतात.

बातम्या आणखी आहेत...