शेअर मार्केट / सेन्सेक्स 10% पडल्याने लागले लोअर सर्किट, 45 मिनिटांसाठी ट्रेंडिंग थांबवली; आता सेंसेक्स 3439 तर निफ्टी 980 पॉइंटने खाली

  • सेन्सेक्स : आतापर्यंत पाच वेळ लोअर सर्किट लागले, १९९० मध्ये झाला होता वापर

दिव्य मराठी

Mar 23,2020 01:55:32 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या भीतीने देशातील शेअर बाजाराची सोमवारची सुरुवात अतिशय वाइट झाली. सुरुवातीच्या अर्ध्या तासातच बाजारात लोअर सर्किट लावावे लागले. बीएसई 10% अर्थात 2991.85 अंकांनी घसरून 26,924.11 पर्यंत पोहोचले. तर निफ्टीमध्ये सुद्धा 9.63% अर्थात 842.45 पॉइंटची घसरण होऊन निर्देशांक 7,903 वर येऊन ठेपला. तरीही 45 मिनिटांच्या लोअर सर्किटनंतर बाजार पुन्हा सुरू झाले आणि ट्रेडिंगमध्ये पुन्हा घसरण दिसून आली. सध्या सेंसेक्स 3439.80 पॉइंट कोसळून 26,476.16 वर तर निफ्टी 980.20 पॉइंट खाली येऊन 7,765.25 वर ट्रेडिंग करत आहे.

लोअर सर्किट म्हणजेच बाजारावर खूप वाईट वेळ...

जुलै 2001 च्या सेबीच्या गाइडलाइननंतर सर्किटची सुरुवात झाली होती. भारतीय शेअर बाजारात अचानक आलेल्या मोठ्या चढ उत्तर रोखण्यासाठी सर्किट लावले जाते. हे दोन पद्धतीचे असतात. अपर सर्किट आणि लोअर सर्किट. अपर सर्किट तेव्हा लावले जाते, जेव्हा बाजार एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढतो आणि जेव्हा त्याच सीमेपेक्षा कमी होतो, तेव्हा लोअर सर्किटचा वापर केला जातो. सेबीने सर्किटसाठी तीन ट्रिगर लिमिट 10%, 15% आणि 20% ठरवली आहे. म्हणजेच त्यावेळी बाजार जेव्हढ्यावर आहे, त्याच्या 10%, 15% आणि 20% कमी-जास्त झाल्यास सर्किट लावले जत्रे. शुक्रवारी बाजारात वेगवान घसरणीनंतर सेंसेक्समध्ये लोअर सर्किट लावले गेले होते.

सेन्सेक्स : आतापर्यंत पाच वेळ लोअर सर्किट लागले, १९९० मध्ये झाला होता वापर

> २१ डिसेंबर १९९० : सेन्सेक्समध्ये १६.१९% ची घसरण नोंदली होती. या घसरणीनंतर शेअर बाजार १०३४.९६ च्या पातळीवर पोहोचला होता.

> २८ एप्रिल १९९२ : तेव्हा सेन्सेक्समध्ये १२.७७%ची घसरण नाेंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ३८९६.९०च्या पातळीवर बंद झाला होता.

> १७ मे २००४ : शेअर बाजारात ११.१४% ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ४५०५.१६ च्या पातळीवर बंद झाला होता.

> २४ ऑक्टोबर २००८ : सेन्सेक्समध्ये १०.९६%ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ८७०१.०७ च्या पातळीवर बंद झाला होता.

> १३ मार्च २०२० : सेन्सेक्स ११% कोसळला, यानंतर लोअर सर्किट लागले. यानंतर बाजार ४५ मिनिटांपर्यंत बंद करावा लागला.


लोअर सर्किट म्हणजे काय?


शेअर बाजारात अचानक आलेला चढ-उतार रोखण्यासाठी सर्किट लावले जाते. हे दोन प्रकारचे असते. अपर सर्किट आणि लोअर सर्किट. अपर सर्किट हे बाजार ठरलेल्या सीमेपेक्षा जास्त वाढल्यावर लागते. या सीमेपेक्षा जास्त घसरल्यास लोअर सर्किटचा वापर केला जातो. सर्किटसाठी मर्यादा १०%, १५% आणि २०% निश्चित आहे.

X