आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा फटका:घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ, मुंबईतील दर आता 1000 रुपयांच्या पुढे

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शनिवारी 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीत नवीन किंमत 999.50 रुपये झाली आहे. तर मुंबईतील दर 1 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर त्यांची किंमत 2,355 रुपयांवर गेली आहे.

यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, एप्रिल महिन्यात या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने लोकांच्या अडचणी वाढणार हे नक्की. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. कारण आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनता हैराण झाली आहे.

अशा स्थितीत गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांना नक्कीच त्रास होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. नवीन दरानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवरून 2355.50 रुपये झाली आहे. त्याचबरोबर पाच किलोचा एलपीजी सिलिंडर 655 रुपयांचा झाला आहे.

देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची प्रक्रियाही सुरूच असून महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. गेल्या वेळी 22 मार्च 2022 रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर गेली होती.

बातम्या आणखी आहेत...