आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • LPG Cylinder Rs 1000; Narendra Modi Govt Likley To Changes LPG Subsidy Scheme; News And Live Updates

सणापूर्वी महागाईचा फटका:1000 रुपयांपर्यत होऊ शकते घरगुती एलपीजी सिलिंडर, सरकार यावरील अनुदान पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 वर्षात 6 पटीने कमी झाला सरकारवरील अनुदानाचा भार

देशातील वाढत्या महागाईचा सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात ग्राहकांना प्रति एलपीजी सिलिंडर 1000 रुपये मोजावे लागू शकतात. तर दुसरीकडे, केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. तथापि, सध्यातरी अशी कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. परंतु, ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत, असे सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनातून समोर आले आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एलपीजी सिलिंडरबाबत सरकारच्या दोन भूमिका
मीडिया रिपोर्टनुसार, एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार दोन भूमिका घेऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जसे चालू आहे, तसे चालू देणे. दुसरे म्हणजे, उज्ज्वला योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्राहकांनाच अनुदान दिले पाहिजे. मात्र, सध्यातरी सरकारकडून सबसिडी देण्याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले गेले नाही.

1 वर्षात 6 पटीने कमी झाला सरकारवरील अनुदानाचा भार
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 3,559 कोटी रुपये ग्राहकांना सबसिडी म्हणून दिले होते. तर 2019-2020 या आर्थिक वर्षात हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षातच सरकारने सबसिडीमध्ये सुमारे 6 पट कपात केली आहे. यामुळे सरकारवरील अनुदानाचा भार एका वर्षात 6 पटीने कमी झाला आहे.

अनुदानासंदर्भात आता काय नियम आहेत?
सध्याच्या नियमांनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ घेता येणार नाही. या व्यतिरिक्त, मे 2020 मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

यावर्षी 190.50 रुपयांनी महाग झाले गॅस सिलिंडर
दिल्लीत या वर्षी 1 जानेवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. परंतु, आता एका सिलेंडरची किंमत 884.50 रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

देशातील 29 कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन
भारतातील सुमारे 29 कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी एलपीजी कनेक्शनचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...