आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर्सवरील किंमतीत 10 रुपयांची कपात केली आहे. नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. दिल्लीत एलपीजी सिलिंडर्सची किंमत आता 819 रुपयांवरुन 809 रुपयांवर आली आहे. एलपीजी कपात करण्याचा फायदा संपूर्ण देशातील ग्राहकांना मिळेल. मात्र हा दिलासा फार काही समाधानकारक नाही. याचे कारण म्हणजे मागील चार महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 225 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे महागाईला सामोरे जाणा-या सर्वसामान्यांसाठी 10 रुपयांची ही कपात अतिशय कमी आहे.
या कपातीनंतर राजधानी दिल्लीत विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये झाली आहे. पूर्वी याची किंमत 819 रुपये होती. मे 2020 नंतर एलपीजीच्या किंमती कमी केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
डिसेंबर ते मार्च या काळात किंमत 225 रुपयांनी वाढली
नोव्हेंबरमध्ये दिल्लीत विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये होती. 1 डिसेंबर रोजी त्याची किंमत वाढून 644 रुपयांवर गेली होती. 15 डिसेंबर रोजी त्यात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि गॅस सिलिंडर 694 रुपयांचे झाले. 4 फेब्रुवारीला पुन्हा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आणि गॅस सिलिंडर 719 रुपयांचे झाले. 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आले. 25 फेब्रुवारीला 25 रुपये प्रति सिलिंडर वाढविण्यात आले. 1 मार्च रोजी 25 रुपयांच्या दरवाढीनंतर सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली. अशाप्रकारे गॅस सिलिंडरच्या किंमतीत डिसेंबर ते मार्च या काळात 5 वेळा किंमती वाढवून 225 रुपयांची वाढ झाली.
3% स्वस्त हवाई इंधन
दुसरीकडे, एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) च्या किंमतीत आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून 3% कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राजधानी दिल्लीतील एटीएफची किंमत प्रति किलोलिटरमध्ये 1887 रुपयांनी खाली आली आहे. आता दिल्लीतील एटीएफ 58,374.16 रुपये प्रति किलोलिटरपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एटीएफच्या किंमती चार पट वाढविण्यात आल्या होत्या.
विमान कंपन्यांना दिलासा मिळेल
कोविड -19 मुळे विमान कंपन्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने उड्डाण करता येत नाहीये नाही. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढत आहे. एटीएफच्या किंमतीतील कपातीमुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचा खर्च कमी होईल. बर्याच राज्यात पुन्हा एकदा कोविड निर्बंध लादले जात आहेत. यामुळे हवाई प्रवासावरही परिणाम होत आहे. दरम्यान, कोविड -19 संक्रमण वाढत असतानाही देशांतर्गत उड्डाण सेवा बंद करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल नाही
1 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आठवड्यातून तीनदा कपात केल्यानंतर सलग दुस-या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 60 ते 61 पैशांची कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 90.56 रुपये प्रति लिटर मिळत आहे. डिझेल प्रति लिटर 80.87 रुपये मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात, तर एटीएफ आणि एलपीजी दर दर महिन्याच्या पहिल्या आणि 16 तारखेला बदलतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.