आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Madhya Pradesh, Chhattisgarh, Rajasthan, Bihar And Maharashtra To Lose 1.50 Lakh Crore; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे आर्थिक नुकसान:महाराष्ट्रासह देशाचे 1.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान, 'या' राज्यांना सर्वाधिक फटका

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीडीपीतील 80 टक्के नुकसान फक्त तीन राज्यांमुळे

कोरोना महामारीचे वाढती पार्श्वभूमी लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे देशातील राष्ट्रीय सकल उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे देशाभरातील महाराष्ट्रसह दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार असून यामुळे देशाचा 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ही आकडेवारी चालू परिस्थितील असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

गेल्या वर्षाभरापासून कोरोनामुळे राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या विकास दरांमध्ये घट पाहायला मिळत आहे. याला सुधारण्यासाठी आपल्यासारख्या विकसनशील देशाला मोठा कालावधी लागण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

जीडीपीत घट होऊ शकते

एसबीआयच्या अवहालानुसार, कोरोना लॉकडाऊनमुळे देशाचा विकास दर 11% वरुन 10.4% येण्याचा अंदाज आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान महाराष्ट्रचे होणार असून राज्याला 81 हजार 672 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्र राज्याचे योगदान खूप मोठे असून महाराष्ट्राची जीडीपी 29.80 लाख कोटी रुपयांची आहे. त्यानंतर दोन नंबर मध्य प्रदेश राज्याचा नंबर येत असून त्याची जीडीपी 11.30 लाख कोटी रुपयांची आहे व त्यामुळे राज्यासह देशाला 21 हजार 712 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

जीडीपीतील 80 टक्के नुकसान या तीन राज्यांमुळे
या लॉकडाऊनमुळे देशाचे 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असून यामधील 80 टक्के वाटा फक्त तीन राज्यांचा आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्र राज्याचे 54% प्रमाण असून तीन नंबरवर राजस्थानचा समावेश होतो. राजस्थानची जीडीपी 12 लाख कोटी रुपयांची असून यामुळे 17 हजार 232 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. छत्तीसगडची जीडीपी 3.80 लाख कोटी रुपये असून त्याचा तोटा 7 हजार 347 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. यासह बिहारची जीडीपी 7.60 लाख कोटी असून त्याचा 6 हजार 222 कोटी रुपयांचा तोटा होईल.

बातम्या आणखी आहेत...