आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Maharashtra Has The Highest Share In GST Collection In The Country | Marathi News

अर्थ मंत्रालयाची अधिकृत माहिती:जीएसटी संकलनामध्ये देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलन २८ टक्क्यांनी वाढून १,४८,९९५ कोटी रुपये झाले आहे. यापूर्वी केवळ एकदा याच वर्षी एप्रिलमध्ये यापेक्षा जास्त १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्याचे कलेक्शन १,१६,३९३ कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने सोमवारी अधिकृत माहिती देताना सांगितले, जुलै महिन्यामध्ये लागोपाठ पाचव्यांदा जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांच्या वर झाले आहे. तथापि, जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. तो २२,१२९ कोटी रुपये इतका आहे.

चांगले अनुपालन, आर्थिक पुनर्प्राप्तीचा परिणाम
अर्थ मंत्रालयानुसार, ‘जीएसटी संकलनाचे जुलैचे दमदार आकडे चांगले अनुपालन निश्चित करण्यासाठी जीएसटी काैन्सिलद्वारे अवलंबलेल्या विविध उपायांचा परिणाम आहे. शिवाय ही आकडेवारी देशात आर्थिक सुधारणेचा परिणामही दर्शवते.’

बिहार वगळता बहुतांश मोठ्या राज्यांत १०% वाढ
राज्य संकलन वाढ
गुजरात 9,183 20%
महाराष्ट्र 22,129 17%
राजस्थान 3,671 17%
पंजाब 1,733 13%
मध्य प्रदेश 2,966 12%
छत्तीसगड 2,695 11%
जीएसटीचे आकडे कोटी रुपयांत

बातम्या आणखी आहेत...