आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Maharashtra Lockdown News An Updates; Hotel, Trade And Transport Sector Suffer Losses Upto 40 Thousand Crores

लॉकडाउनमुळे 40 हजार कोटींचा घाटा:महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा देशावर मोठा परिणाम; हॉटेल, ट्रेड आणि ट्रांसपोर्ट सेक्टरला धोक्याची घंटा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 % रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत

कोरोना रुग्णांच्या वाढीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याक कडक निर्बंध आणले आहेत. पण, महाराष्ट्रातील याच लॉकडाउनमुळे देशाला 40 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रांसपोर्ट सेक्टरवर पडेल. हा अंदाज केअर रेटिंग एजंसीने व्यक्त केला आहे.

इकोनॉमिक अॅक्टिव्हिटीमध्ये 0.32 टक्के घट

रेटिंग एजंसी केअरने म्हटले की, इकोनॉमिक अॅक्टिव्हिटीमध्ये 0.32% घट होऊ शकते. एका आठवड्यांपूर्वी याच एजंसीने GDP ग्रोथ कमी होऊन 10.7 ते 10.9% होईल, असे म्हटले होते. यापूर्वी ही ग्रोथ 11 ते 12% होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 % रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात सोमवारी 57 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार, दररोज रात्री आणि शुक्रवार रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत राज्यात पूर्ण लॉकडाऊन असेल. या काळात काही अत्यावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. ही बंदी या महिन्याच्या अखेरपर्यंत असेल. या वर्षात फक्त महाराष्ट्रानेच लॉकडाऊन केला नाही, तर यापूर्वीही अनेक राज्यांनी अंशतः लॉकडाऊन केला आहे. यात मध्य प्रदेश, गुजरातसह अने राज्यांचा समावेश आहे. केअर एजंसीचे म्हणणे आहे की, यामुळे उत्पादन आणि विक्रीवर मोठा परिणाम पडू शकतो.

महाराष्ट्राचे योगदान 20.7 लाख कोटी रुपयांचे

राष्ट्रीय पातळीवर ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडचा अंदाज या चालू आर्थिक वर्षात 137.8 लाख कोटी रुपयांचा आहे. यात एकट्या महाराष्ट्राचे योगदान 20.7 लाख कोटी रुपयांचे आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्राचे 2% नुकसान होऊ शकते. हा घाटा महाराष्ट्रातील विभिध सेक्टर्स मध्ये होईल. एका महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे यावर मोठा परिणाम पडेल. ट्रेड, हॉटेल आणि ट्रांसपोर्ट सेक्टरला सर्वाधिक 15,722 कोटींचा घाटा होईल.

फायनांशिअल आणि रिअल इस्टेट सेक्टरवरही दिसेल मोठा परिणाम

वरील सेक्टरसोबतच फायनांशिअल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट आणि इतर काही सेवांवरही परिणाम दिसेल. या सर्वांना 9,885 कोटी रुपयांचा घाटा होण्याचा अंदाज आहे. पब्लिक प्रशासनला 8,192 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. एजंसीने म्हटले की, देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे. यानंतर, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक आहे.

बातम्या आणखी आहेत...