आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या काळात एप्रिल ते नोव्हेंबर या लॉकडाऊन ते अनलॉकच्या ८ महिन्यांत देशात ९८,६७५ नव्या कंपन्यांची नोंदणी झाली. त्यात महाराष्ट्रात १७ हजारांवर नव्या कंपन्यांची नोंद झाली. या काळात नव्या कंपनी नोंदणीत १७.६३ टक्के वाट्यासह महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. याबाबतीत महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण ही देशातील ‘टॉप फाइव्ह’ राज्ये ठरली आहेत. एसबीआयच्या अहवालातून हे समोर आले आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या कोरोनाकाळात देशात विविध क्षेत्रांतील एकूण ९८,६७५ कंपन्यांची नोंदणी झाली. त्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील धातू आणि रासायनिक उत्पादने, फूड स्टफ, मशिनरी आणि उपकरणे, पेपर व पेपर प्रॉडक्ट्स, लाकडी उत्पादने, लेदर आणि लेदर प्रॉडक्ट आदी क्षेत्रातील सर्वाधिक २१४८४ कंपन्यांची नोंद झाली. तर बिझनेस सर्व्हिसेस, बांधकाम क्षेत्रासह कम्युनिटी, पर्सनल आणि सोशल सर्व्हिसेस, खाण, वाहतूक, स्टोअरेज, कृषी व संलग्न सेवा क्षेत्रातील कंपन्यांचाही नव्या नोंदणीत समावेश आहे. सर्वात कमी कंपनी नोंदणी विमा क्षेत्रात झाली आहे. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशात ८१,६९७ कंपन्यांची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा नव्या कंपन्यांच्या नोंदणीत २० टक्के वाढ झाली आहे.
महाराष्ट्राला पसंती, गुजरात सातव्या स्थानी : एसबीआयच्या अहवालानुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशात सर्वाधिक १७,३९२ नव्या कंपन्यांची नोंदणी महाराष्ट्रात झाली. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असतानाही कंपन्यांनी या राज्यांना पसंती दिल्याचे अहवाल सांगतो. कोरोना काळातील कंपनी नोंदणीसंदर्भातील टॉप १० राज्यांत गुजरातला सातवे स्थान मिळाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.