आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Maharashtra Tourism Has Been Ranked As The 'Silver Play Button', The Second Largest Among All Indian Tourism Boards In The Country

1 लाखाहून अधिक फॉलोअर्स:महाराष्ट्र पर्यटनला ‘सिल्व्हर प्ले बटण’,  देशातील सर्व भारतीय पर्यटन मंडळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यू ट्यूब या समाजमाध्यमावर १ लाखाहून अधिक फॉलोअर्सचा आकडा पार केल्याबद्दल महाराष्ट्र पर्यटनाला ‘सिल्व्हर प्ले बटण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्या १ लाख २७ हजार फॉलोअर्ससह भारतातील सर्व पर्यटन मंडळांमध्ये महाराष्ट्र पर्यटन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारच्या माहिती व व्हिडिआेजने १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत आणि यू ट्यूबचे कुटुंब नियमितपणे वृद्धिंगत होत आहे.

महाराष्ट्र पर्यटन निव्वळ नावापुरतेच नाही तर प्रत्यक्षात समाजमाध्यमांवर सक्रिय आहे. महाराष्ट्र पर्यटनाचे इन्स्टाग्रामवर ३ लाख २० हजारांहून अधिक फॉलोअर्स, ट्विटरवर ३ लाख १५.७ हजार फॉलोअर्स आणि फेसबुकवर ८ लाख ६९ हजार फॉलोअर्स मिळवले आहेत. मिलिंद बोरीकर, संचालक, पर्यटन संचालनालय म्हणाले, ‘आमच्यासाठी हा खरोखरच एक अभिमानाचा क्षण आहे. असा पुरस्कार मिळवण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे लागतात. आमच्या कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवण्यासाठी बारकाईने काम करत आहे. ‘गोल्डन प्ले बटण’ मिळवून त्याहीपेक्षा मोठे ध्येय गाठण्याचा आमचा मानस आहे.

बातम्या आणखी आहेत...