आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:महिंद्राची ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिकअप लाँच

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनाने हलक्या व्यावसायिक वाहन विभाग एलसीयू-२ ते ३.५ टन श्रेणीतील अग्रेसर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड एमअँडएमने आधुनिक भारताच्या वाहतूक आणि पुरवठ्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातील पिकअप्स श्रेणीतील नवीन ब्रँड बोलेरो मॅक्स पिकअप सादर करत असल्याची घोषणा केली. कंपनीने बोलेरो मॅक्स पिकअप सिटी ३००० सादर करुन ब्रँडचे अनावरण केले.

बोलेरो मॅक्स पिकअप सिटी ३००० आकर्षक वित्त योजना आणि डाऊनपेमेंट २५ हजारासह ७, ६८,००० रुपये किमतीच्या एक्स शोरूम पासून पुढे आहे. वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळातील व्यवसायांच्या गतिमान गरज पूर्ण करण्यासाठी महिंद्रा पिकअप विभागामध्ये एक नवीन ब्रँड सादर करत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, महिंद्रामध्ये आम्ही ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांना अधिक कमाई करुन देत समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. ऑल-न्यू बोलेरो मॅक्स पिकअप हा एक भविष्यवादी ब्रँड असून प्रगत आयएमएएक्सएक्स तंत्रज्ञान, टर्न सेफ लाइट्स, उंची समायोजित करता येण्याजोगे आसन, शक्तीशाली आणि कार्यक्षम इंजिन, श्रेणीतील अग्रगण्य पेलोड क्षमता यासारख्या श्रेणीत पहिल्यांदाच असलेल्या अनेकानेक वैशिष्टयांनी हा ब्रँड भरलेला आहे. पिकअप विभागातील या नवीन मापदंड ब्रँडसह महिंद्राने पुन्हा एदका आपल्या ग्राहकांचे अमूल्य हित जपण्याचा आपला उद्देश आणि क्षमता प्रदर्शित केली. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी आणि प्राॅडक्ट डेव्हलपमेंट अध्यक्ष आर.

वेलुसामी म्हणाले, आमचे नवीनतम सादरकरण आॅल-न्यू बोलेरो मॅक्स पिकअपची अभियांत्रिकी ही पिकपअ बाजारपेठेच्या उच्च मागणी, नेहमी विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसवर होस्ट केलेलया आयएमएएक्सएक्स कनेक्टिव्हिटी अॉफरिंगसह आम्ही ती सुसज्ज केली आहे. त्यात अतुलनीय तंत्रज्ञान वैशिष्ट्ये असून ती ग्राहकांच्या मालमत्तेचे चांगल्या प्रकारे परीक्षण करण्यास मदत करते.

बातम्या आणखी आहेत...