आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची 'स्कॉर्पिओ-एन' सहा मॉडेलमध्ये लॉंच:SUV ची किंमत 11.99 लाखापासून; ड्युअल एअरबॅग्जसह उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी परिपूर्ण

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्राने भारतात आपली नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लॉंच (Scorpio N) लॉंच केली आहे. Scorpio N SUV पेट्रोल इंजिनने सुसज्ज असलेल्या बेस 'Z2' ट्रिमची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे. महिंद्राने स्कॉर्पिओ-एन (Scorpio N) या मॉडेलला 6 व्हेरिएंटमध्ये Z2, Z4, Z6, Z8, Z8L आणि Z8L(6S) सह देशात लॉंच केली आहे.

स्कॉर्पिओ-एन मध्ये लॉंच (Scorpio N) झालेल्या टॉप मॉडेल 'N Z8L' ची सुरूवातीची किंमत 23.90 लाख आहे. ही एसयुव्ही डीप फॉरेस्ट, एव्हरेस्ट व्हाइट, नेपोली ब्लॅक, डॅझलिंग सिल्व्हर, रेड रेज, रॉयल गोल्ड आणि ग्रँड कॅनियन या सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर लॉंच झालेले 'स्कॉर्पिओ एन Z2 मॉडेल' फक्त एव्हरेस्ट व्हाइट, नेपोली ब्लॅक आणि डॅझलिंग सिल्व्हर या तीन रंगातच उपलब्ध असणार आहे.

स्कॉर्पिओ एन एसयुव्हीची वैशिष्ट्ये

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio N) Z2 SUV च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले. तर त्यात ABS, EBD, मागील पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्ज, समोर आणि मागील बाजूस हवेशीर डिस्क ब्रेक आणि ISOFIX अँकरिंग पॉइंट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Scorpio N Z2 ला स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी, दुसरी रो एसी व्हेंट्स, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्ससह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एक मोनोक्रोम मिड डिस्प्ले, पॉवर विंडो, दुसऱ्या रांगेत 1-टच टंबल सीट, स्किड प्लेट्स, ORVM आहे. माउंट केलेल्या एलईडी टर्न सिग्नलसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत.

पेट्रोल-डिझेल दोन्ही प्रकारांत उपलब्ध
महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) Z2 SUV मध्ये 2.0-लिटर आणि टर्बोचार्ज्ड युनिट पेट्रोल इंजिन आहे. जे 200bhp पीक पॉवर आणि 370Nm पीक टॉर्क जनरेट करते. तथापि, उच्च ट्रिम पातळीच्या तुलनेत डिझेल युनिट किंचित कमी शक्तिशाली आहे. Z2 ट्रिम लेव्हल 2.2-लीटर आणि टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे फक्त 130bhp पीक पॉवर आणि 300Nm पीक टॉर्क देते. दोन्ही इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, Z2 ट्रिममध्ये 'क्रोम-लेस' बाह्य भाग असेल अशी आमची अपेक्षा आहे. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे क्रोम घटक सहजपणे जोडले जाऊ शकतात. याशिवाय, बेस Z2 ट्रिमला 17-इंचाचे स्टील व्हील मिळतात.

स्कॉर्पिओ N साठी 1 मिनिटात 25 हजार बुकिंग
नुकत्याच लॉंच झालेल्या Mahindra Scorpio N SUV चे फक्त 1 मिनिटात 25 हजार बुकिंग झाले होते. याशिवाय, बुकिंग पोर्टल उघडल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत 1 लाखांहून अधिक महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्हीचे बुकिंग झाले. त्या तुलनेत महिंद्रा SUV 700 ला 25 हजार बुकिंग नोंदवण्यासाठी 1 तास आणि 50,000 बुकिंगपर्यंत पोहोचण्यासाठी 2 तास लागले होते. अशी प्रभावी बुकिंग कामगिरी महिंद्रासाठी नवा रेकॉर्ड आहे. एवढ्या भक्कम बुकिंगच्या आकड्यांवरून असे दिसते. नव्याने लॉंच झालेल्या Scorpio N SUV ने कंपनीच्या अपेक्षा ओलांडल्या आहेत.

25 हजार ग्राहकांना सुरूवातीच्या किंमतीतच मिळेल

स्कॉर्पिओ N बुक करणार्‍या पहिल्या 25 हजार ग्राहकांना सुरुवातीच्या किमतीत SUV मिळणार आहे. ही अट ऑटोमेकर कंपनीने आधीच जाहीर केली होती. महिंद्रा स्कॉर्पिओ N SUV च्या यशाचे श्रेय 'XUV-700' या कारला देखील दिली जाऊ शकते. कारण, महिंद्रा स्कॉर्पिओ-N कडून XUV700 सारख्या कार कामगिरीची अपेक्षा आहे.

यंदा N-SUV चे 20 हजार युनिट्सचे उत्पादन

महिंद्रा स्कॉर्पिओ N SUV ची डिलिव्हरीची तारीख जवळ येत असताना ऑटोमेकर या वर्षाच्या अखेरीस Scorpio N SUV च्या 20,000 युनिट्सचे उत्पादन करणार आहे. दरम्यान, त्यानंतर कंपनीने खुलासा केला की SUV च्या 'Z8 L' ट्रिम लेव्हलला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी Scorpio N SUV ची 'Z8 L' ट्रिम बुक केली आहे. त्यांना त्यांची कार इतरांपेक्षा लवकर मिळण्याची शक्यता आहे. हे स्पष्ट आहे की, महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या बेस ट्रिममध्ये एसयूव्हीच्या टॉप-एंड ट्रिममध्ये दिसणारी वैशिष्ट्ये नाहीत.

बातम्या आणखी आहेत...