आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कमतरता:देशात फक्त 10% महिला सीएफए चार्टर

सचिन पी. ममपट्टा | मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील मोजक्याच महिलांकडे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये सोन्यासारखी मानली जाणारी आर्थिक पात्रता आहे.ही स्थिती कामाच्या प्रतिष्ठित ठिकाणी महिलांचे कमकुवत प्रतिनिधित्व दाखवते.

तीन टप्प्यातील चार्टर्ड फायनान्शिएल अॅनालिस्ट (सीएफए) परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या महिलांचा वाटा भारतात जवळपास १३ टक्के आहे. या तुलनेत जागतिक पातळीवर हा आकडा २० टक्के आहे. सीएफए इन्स्टिट्यूटने ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त ‘बिझनेस स्टँडर्ड’ च्या विनंतीच्या उत्तरात ही माहिती दिली. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात महिलांची भागीदारी २७ टक्के आहे, मात्र परीक्षेचया तिसऱ्या टप्प्यात महिलांचे प्रतिनिधित्व ६ टक्के घटून २१ टक्के होते. तर पुरुषांचे प्रतिनिधित्व ७३ टक्क्यांवरुन वाढून ७९ टक्क्यांवर जाते. सीएफए परीक्षेचा तिसरा टप्पा उत्तीर्ण करणाऱ्या जवळपास २२ टक्के महिला आहेत. मात्र ही परीक्षा उत्तीर्ण करणारी प्रत्येक महिला चार्टर होल्डर होत नाही. जे परीक्षा उत्तीर्ण करतात आणि ४ हजार तासांचा अनुभव घेतात त्यांनाच चार्टर दिले जाते. चार्टर मिळवणाऱ्या लोकांच्या संख्येत महिलांचा वाटा घटून १० टक्क्यांच्या जवळपास आहे. तर पुरुषांचा वाटा सुमारे ९० टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...