आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • MakeMyTrip Is Also In The Food Delivery Business; The Company Started In Delhi, Mumbai, Chennai And Bangalore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:मेकमायट्रिपही अन्नपदार्थ पुरवठा व्यवसायात; दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये कंपनीने केली सुरुवात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • वाहतूक, पर्यटन क्षेत्रातील कंपनीचे स्विगी, झोमॅटोला आव्हान

ऑनलाइन प्रवास सेवा देणारी कंपनी मेकमायट्रिप आता देशातील निवडक शहरांत लक्झरी हॉटेल, महागडे रेस्तराँच्या पदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी करेल. कंपनीने गुरुवारी सांगितले की, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी विविध हॉटेल साखळी आणि स्वतंत्र रेस्तराँसोबत भागीदारी केली आहे. कंपनीने एका निवेदनात सांगितले की, लॉकडाऊनमुळे लोकांचे रेस्तराँमध्ये खाणे बंद झाले आहे. अशा स्थितीत कंपनीने महागड्या रेस्तराँ, हॉटेलातील पदार्थ घरापर्यंत पोहोचण्यासाठी भागीदारी केली आहे. कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारीदीपक टली म्हणाले, ऑनलाइन पदार्थ डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न घरातच चांगले भोजन उपलब्ध करणे हा आहे.

अनेक पंचतारांकित हॉटेलचा स्विगी, झोमॅटोशी करार

देशात पंचतारांकित हॉटेल ब्रँड मेरियट, हिल्टन, द पाक, हयात आदींनी काही आठवड्यांत झोमॅटो व स्विगीसोबत भागीदारी केली आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल मेकमायट्रिपनेही स्पर्धेसाठी मेरियट, दिल्लीत रोजेट, बंगळुरूत रॉयल आर्किड, मुंबईत द ललित, चेन्नईचे द रेसिडन्सी आदीसोबत करार केला आहे. दिल्लीत द पार्कशी “एक्सक्लुझिव्ह डिलिव्हरी ऑप्शन’चा करार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...