आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Making Money By Giving Advice On Social Media Will Be Difficult, SEBI Will Rein In Financial Influencers

पुढाकार:सोशल मीडियावर सल्ले देऊन पैसे कमावणे होणार अवघड , फायनाान्शियल इन्फ्लुएन्सरवर लगाम घालणार सेबी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर आणि म्युच्युअल फंडसारख्या मालमत्तेत गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स किंवा फिनएन्फ्लुएन्सर्सना लगाम घालण्याची तयारी सुरू. बाजार नियामक सेबी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा न पोहोचवता फिनएन्फ्लुएन्सर्सला नियमांच्या कक्षेत आणण्याची पद्धत शोधत आहे. अशांना बळी पडून लाखो गुंतवणूकदार त्यांच्या ठेवी गमावत आहेत. व्यवस्थेअंतर्गत आर्थिक सल्ला देणाऱ्या व्यक्तीला गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंदणी करावी लागते. अशा लाेकांसाठी आयएच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर अशा फिनएन्फ्लुएन्सर्सचा पूर आला आहे, ज्यांची सेबीत नोंदणी नाही. मात्र त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड््स कौन्सिल ऑफ इंडियानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाशी संबंधित ४१५ प्रकरणे नोंदवली गेली.

असे फायनान्सर कायद्याच्या कचाट्यातून सुटताहेत सोशल मीडियावर सल्ला देणारे शुल्क आकारत नाहीत किंवा गुंतवणूकदारांशी करार करत नाहीत. म्हणून त्यांच्याशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक

मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाशी संबंधित विभाग 21-22 एप्रिल-सप्टें फायनान्स 43 15 क्रिप्टोकरन्सी 372 56 एकूण 415 71 स्रोत : एएससीआय

मिस-सेलिंग थांबवणे मुख्य उद्देश अधिकाऱ्याने सांगितले, सेबीचा मुख्य उद्देश मिस-सेलिंग म्हणजेच चुकीच्या पद्धतीने कोणत्याही शेअर किंवा फंड स्क्रीमची विक्री आणि त्यासंबंधी हेराफेरी करणे आहे. फिनएन्फ्लुएन्सर्स गुंतवणूकदारांसोबत करार तर करत नाही, यावर सेबी लक्ष देणार आहे.

दिव्‍य मराठी एक्‍स्पर्ट प्रकाश दिवाण, मार्केट एक्स्पर्ट {सर्व फिनफ्लुअर्सपासून वाचण्याची गरज आहे का ? नाही, ज्या फायनान्शियल इन्फ्लुएन्सरची सेबीअंतर्गत नोंदणी आहे त्यांच्यावर विश्वास करू शकता. {नोंदणी आहे की नाही कसे कळेल? जे फिनफ्लुअर्स नोंदणीकृत आहेत, ते आपल्या प्रोफाइलमध्ये तशी माहिती देतात.

बातम्या आणखी आहेत...