आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Malabar Gold And Diamonds Will Invest Rs 9,860 Crore In The Country | Marathi News

गुंतवणूक:मलाबार गोल्ड अँड डायमंड्स देशात 9,860 कोटींची गुंतवणूक करणार ; गोल्ड अँड डायमंड्स इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक

कोची21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स जगातील सर्वात मोठी ज्वेलरी रिटेल चेनपैकी एक आहे. पुढच्या तीन वर्षात भारतात ९८६० कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. नुकतेच कोच्चीमध्ये झालेल्या एका इन्वेस्टर्स राउंड टेबलमध्ये मलाबार ग्रुपचे चेअरमन एमपी अहमद आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्स इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ अशर यांनी संयुक्त घोषणा केली. या प्रसंगी केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गायेल आणि राज्याचे उद्योग मंत्री पी राजीव उपस्थित होते. दिलीप नारायण, प्रमुख ट्रेजरी आणि बुलियन, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनेदेखील सम्मेलनात भाग घेतला होता. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या मेकइन इंडिया, मार्केट ट्रू द वर्ल्ड यांच्या पुढाकारासाठी दुप्पट गुंतवणूक करणार आहे. ज्वेलरी रिटेलर २०२५ पर्यंत ५०० रुपयापर्यंत शोरुम उघडण्याची योजना आखत आहे. यामुळे सुमारे ११,००० लोकांना रोजगाराची संधी मिळेल. गोलमेज राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाचे आयोजन केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयलने भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया कार्यक्रमासोबतच आपल्या मोठ्या योजनांमुळे रोजगारांच्या संधीचे कौतुक केले. कंपनीच्या या कार्याला केंद्र सरकारचे पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. वर्तमानात मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या दहा देशात पसरलेल्या २८० पेक्षा जास्त शोरूम आणि पाच देशात १४ उत्पादन युनिट्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...