आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै महिन्यात किरकोळ महागाई घटली:दिलासा; किरकोळ महागाई 7.1 वरून 6.71 टक्क्यावर आली, सलग सातव्या महिन्यात घट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्यात महागाई आघाडीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई जुलैमध्ये 6.7 टक्क्यापर्यंत घसरली. जूनमध्ये ते 7.01 टक्के होती.

दरम्यान, हा सलग 7 वा महिना आहे की, किरकोळ महागाईने RBI ची 6 टक्क्यावरची मर्यादा ओलांडली आहे. किरकोळ महागाई जानेवारी 2022 मध्ये 6.01 टक्के, फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के, मार्चमध्ये 6.95 टक्के, एप्रिलमध्ये 7.79 टक्के आणि मे महिन्यात 7.04 टक्के नोंदवली गेली.

पाच महिन्यातील सर्वात कमी महागाई दर

सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्यांवर आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा महागाई दर हा सलग सातव्यांदा असला तरी पाच महिन्यांतील हा सर्वात कमी दर आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जून 2022 मध्ये महागाईचा दर 7.01 टक्के तर जुलै 2021 मध्ये ही टक्केवारी 5.59 होती. आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढीचा दरही जूनमध्ये 7.01 टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये 6.75 टक्क्यांवर आला आहे.

तथापि, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ अजूनही रिझर्व्ह बँकेच्या 6.0 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या उच्च उंबरठ्याच्या वरच आहे. गेल्या सात महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण 6.0 टक्क्यांनी वाढले आहे. रिझर्व्ह बँकेवर दोन टक्के फरकासह किरकोळ चलनवाढ चार टक्के ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत किरकोळ महागाई 7.0 टक्क्यांच्या वर गेली आहे.

महागाईचा परिणाम कसा होतो ?
महागाईचा थेट संबंध क्रयशक्तीशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाईचा दर 7 टक्के असेल. तर कमावलेल्या 100 रुपयांचे मूल्य फक्त 93 रुपये असेल. त्यामुळे महागाई लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. अन्यथा तुमच्या पैशाचे मूल्य कमी होईल. आज, रशिया आणि ब्राझील वगळता जवळजवळ प्रत्येक देशात व्याजदर नकारात्मक आहेत. नकारात्मक व्याज दर म्हणजे मुदत ठेवींना महागाई दरापेक्षा कमी व्याज मिळते.

महागाई कशी वाढते किंवा कमी होते
महागाईची वाढ आणि घसरण उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. जर लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते अधिक वस्तू विकत घेतील. अधिक वस्तू खरेदी केल्याने वस्तूंची मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा न झाल्यास या वस्तूंच्या किमती वाढतील.
अशा प्रकारे बाजार महागाईला बळी पडतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले. तर बाजारात पैशाचा अतिप्रवाह किंवा वस्तूंची कमतरता यामुळे महागाई वाढते. दुसरीकडे मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्यास महागाई कमी होईल.

RBI महागाई कशी नियंत्रित करते
चलनवाढ कमी करण्यासाठी बाजारातील अत्याधिक तरलता कमी केली जाते. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रेपो दरात वाढ करते. वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या आरबीआयने अलीकडेच रेपो दरात 0.50 टक्के वाढ केली आहे. यासह रेपो दर 4.40 टक्यावरून 4.90 टक्के झाला आहे.

CPI म्हणजे काय
जगभरातील अनेक अर्थव्यवस्था WPI (घाऊक किंमत निर्देशांक) हा महागाई मोजण्यासाठी त्यांचा आधार मानतात. भारतात असे घडत नाही. आपल्या देशात, WPI सोबत, CPI देखील महागाई रोखण्याचे प्रमाण मानले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक आणि पतसंबंधित धोरणे ठरवण्यासाठी किरकोळ महागाईला मुख्य मानक मानते, घाऊक किमती नाही. अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर WPI आणि CPI एकमेकांवर प्रभाव टाकतात. अशा प्रकारे WPI वाढेल, त्यामुळे CPI देखील वाढेल.

किरकोळ महागाईचा दर कसा ठरवला जातो
कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत. ज्या किरकोळ महागाई दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा जवळपास 299 वस्तू आहेत, ज्यांच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो.

बातम्या आणखी आहेत...