आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:कार खरेदीत अनेक नवीन आयाम जोडले जाताहेत : गौरव गुप्ता

एन रघुरामन | मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई नवीन आणि लोकप्रिय तंत्रज्ञान काही दिवसांत कालबाह्य होण्याच्या धोक्यात असताना वाहन निर्माते त्यांच्या कारमध्ये नवीन तंत्रज्ञान उत्पादने समाविष्ट करत आहेत. कारण कार खरेदीदार अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यांना वैशिष्ट्यपूर्ण कार खरेदी करायच्या आहेत. या नवीन तंत्रज्ञानाच्या ट्रेंडच्या यादीत त्याचे नाव जोडले आहे एमजी मोटार इंडिया, जी या वर्षी जुलैमध्ये भारतात आपल्या उपस्थितीची ३ वर्षे साजरी करणार आहे. त्याची एमजी झेडएस ईव्ही घ्या, इलेक्ट्रिक एसयूव्ही अायस्मार्ट ईव्ही २.० इन्फोटेनमेंट सिस्टिममध्ये ५० कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह येते. प्रणाली ५जी-कनेक्ट अायपीव्ही ६, ई-सिमसह सुसंगत कार्य करते.

८-इंच स्क्रीनमध्ये जवळपासच्या चार्जिंग स्टेशनचे स्थान, नेव्हिगेशन, आपत्कालीन कन्सीर्ज सेवा, रिमोट लॉकिंग-अनलॉकिंग, एअाय-आधारित व्हॉइस असिस्टंट आणि प्री-इन्स्टॉल केलेले इन्फोटेनमेंट सामग्री तसेच अॅपल कारप्ले आणि अँड्राॅइड अाॅटाे यासह अनेक वैशिष्ट्येदेखील समाविष्ट अाहेत.

एमजी माेटार इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणतात, “अशा प्रकारचे हाय-एंड तंत्रज्ञान एखाद्याला प्रगत वाटते. दैनिक भास्करला दिलेल्या एका खास मुलाखतीत गुप्ता म्हणाले की, ज्या तरुणांना अशी टेक-सक्षम जीवनशैली हवी आहे त्यांना त्यांच्या उत्पादनांमध्ये उच्च ‘मूल्य आधारित प्रणाली’ असलेल्या कंपन्यांशी नेहमी जोडून घ्यायचे असते. त्यामुळेच आम्ही भारतात आमची पहिली कार विकल्यापासूनच मुलींच्या शिक्षणात योगदान देऊ लागलो, असे गुप्ता सांगतात. एमजी आणि इम्पॅक्ट या मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एनजीओने वंचित मुलींना जगाचा सामना करण्यासाठी तयार करण्यासाठी ई-लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. शाळाबाह्य, अनियमित किंवा शाळा सोडलेल्या मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास ते इच्छुक हाेते.

एमजीने आपली कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मोठ्या संधी शोधल्या आहेत. तिने लखनऊच्या मुमताज खान आणि भोपाळच्या खुशबू खान यांसारख्या हॉकी स्टार्सनाच मदत केली नाही तर तिच्या कर्मचाऱ्यांपैकी ३७% महिला आहेत याचीही खात्री केली. ग्राहकांच्या समाधानात प्रथम क्रमांकावर असलेल्या या ९८ वर्षे जुन्या ब्रँडने भारतात एक लाखाहून अधिक कार विकल्या आहेत. देशभरात चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्याने जिअाे आणि बीपीसोबत भागीदारी केली आहे. एमजीचा दावा आहे की वापरकर्त्यांच्या ८५% गरजा होम चार्जिंगने पूर्ण केल्या जातात, एका चार्जिंगवर ४६१ किलोमीटरचा ड्राइव्ह पुरवतो.

एमजीची टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये प्रवेश करण्याची आक्रमक योजना आहे. हे प्रतिष्ठित “एमजी कार क्लब’ चालवते, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक सक्रिय सदस्य केवळ त्यांचे अनुभव शेअर करत नाहीत तर नेटवर्क तयार करतात. हे ब्रँड मालकांना क्लबचे सदस्य असल्याचा अभिमान देते.

बॅटरी तंत्रज्ञानात एमजी मोटर सर्वाेत्कृष्ट कंपनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल गुप्ता म्हणाले, ऑटो इंडस्ट्रीमध्ये बॅटरी तंत्रज्ञान सर्वोत्तम आहे. एमजी झेड एस ईव्ही आणि एमजीईएचएस प्लग-इन हायब्रिडला सुरक्षितता आणि टिकाऊपणासह अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा फायदा होतो. कारण एमजीची मूळ कंपनी (एसएअायसी माेटार्स) जगातील सर्वात अनुभवी ईव्ही उत्पादकांपैकी एक आहे. एमजी झेड एस ईव्ही व एमजी ईएचएस प्लग-इन हायब्रिडच्या बॅटरी संरक्षण तंत्रज्ञानानेदेखील “एल झीराे पातळी’ गाठली आहे. याचा अर्थ थर्मल रनअवे झाल्यास ते बॅटरी पॅकमधून बाहेर पडणार नाही.

भास्कर इंटरव्ह्यू चीफ कमर्शियल ऑफिसर, एमजी मोटर इंडिया

बातम्या आणखी आहेत...