आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Marathi News | PF | Account Balance | Check | PF Balance Check Online; EPFO Organisation Deposited Interest Money In Over 23 Crore Accounts

PF वर व्याज:EPFO ने 23.34 कोटी लोकांना दिले व्याज; तुम्हाला मिळाले का? असे करा चेक

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 23.34 कोटी ग्राहकांच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना PF वर 8.50% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आलेत की नाही? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, याद्वारे आपण शिल्लक रक्कम कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे न मिळाल्यास तक्रार कशी करायची याविषयी माहिती घेणार आहोत, चला तर मग...

या 4 पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा पीएफ खाते चेक करू शकता

एसएमएसच्या माध्यमातून करा बँलेन्स चेक
आपल्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत, ही जाणून घेण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजे एसएमएस. आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN ENG असे टाईप करत 7738299899 या क्रमांकावर एसएमएस करावे लागणार आहे. ENG चा अर्थ तुम्हाला इंग्रजीमध्ये ही माहिती हवी आहे. मात्र तुम्ही तुमच्या मातृभाषेनुसार एसएमएसच्या शेवटी तीन अक्षर लिहून जसे की, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड़, तेलुगु, तामिळ आणि बंगालीत पाठवून पीएफ खाते चेक करू सकता. मात्र तुमचा मोबाईल क्रमांक हा UAN सोबत रजिस्टर्ड असला पाहिजे.

मिस्ड कॉलने चेक करा पीएफ
एसएमएसनंतर पीएफ खाते तपासण्याची सोपी पद्धत म्हणजे मिस्ड कॉल, 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देत तुम्ही तुमचे पीएफ खाते चेक करू शकता. त्यासाठी तुमचा नंबर UAN ला रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. मिस्ड दिल्यानंतर तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल, त्यात तुमचे शिल्लक बँलेन्स दर्शवले जाईल.

उमंग अॅप्सच्या माध्यमातून चेक करा पीएफ खाते

 • सुरुवातील उमंग अॅप्स मोबाईलमध्ये इंस्टॉल करा.
 • त्यानंतर उमंग अॅप्स उघडा आणि EPFO वर क्लिक करा.
 • त्यानंतर employee-centric-services यावर क्लिक करा.
 • त्यानंतर व्यू पासबुक हा पर्याय निवडा, त्यात आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड अर्थात ओटीपी टाका.
 • ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे.
 • त्यानंतर तुमचे पीएफचे पैसे चेक केले जाईल.

वेबसाइटच्या माध्यमातून चेक करा पीएफ

 • वेबसाइटच्या माध्यमातून पीएफ खाते तपासण्यासाठी pf पोर्टल ओपन करा.
 • https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या संकेतस्थळावर जा.
 • संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे UAN आणि पासवर्ड टाका.
 • त्यानंतर तुम्हाला Download/View Passbook असे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • तुम्हाला आता तुमचे पीएफ बँलेन्स कळाले असेल.

पीएफवर व्याज मिळाले नसेल तर तक्रार अशी करा

 • सुरुवातीला https://epfigms.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
 • त्या नंतर Register Grievance या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर पीएफ मेंबर, ईपीएफ पेंशनर, एंप्लायर असे पर्याय असेल त्यावर पीएफ निवडा.
 • पीएफ निवडल्यानंतर संपुर्ण प्रोसेस झाल्यानंतर UAN नंबर आणि सिक्योरिटी कोड भरून Get Details वर क्लिक करा.
 • आता UAN शी लिंक असलेल्या खात्याची माहिती आपल्यासमोर आली असेल.
 • त्यानंतर Get OTP हा पर्याय निवडा, आता ओटीपी टाका.
 • त्यानंतर वैयक्तिक माहिती भरून, त्यानंतर पीएफ क्रमांकावर क्लिक करा ज्याची तुम्हाला तक्रार करायची आहे.
 • त्यानंतर एक पॉप अप दर्शविले जाईल, तिथे आपल्याला पीएफ ऑफिसर, एंप्लायर, कर्मचारी बीमा योजना किंवा पूर्व पेंशन असे पर्याय दिसेल.
 • त्यानंतर माहिती भरून संपुर्ण डॉक्यूमेंट अपलोड करून सबमिटव क्लिक करा.
 • आता तुमची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच तक्रार क्रमांक देखील तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेलवर प्राप्त झाला असेल.
बातम्या आणखी आहेत...