आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने एक टीम तयार केली आहे. या टीमने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर टिप्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात अहमदाबाद आणि मेहसाणा येथे छापा टाकण्यात आला होता, त्या छापेमारीत या नव्या टीमने मोठी मदत केली होती.
सोशल मीडियावर दिल्या जात आहेत टीप्स
सोशल मीडियाच्या अनेक प्लॉटफॉर्मवर शेअर खरेदी-विक्री संदर्भात अनेक जण सल्ले देत असल्याचे पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे हे सल्ले देणारे सेबीचे कर्मचारी नाहीत. अशा प्रकारचे सल्ले देणे हे सेबीच्या विरोधात आहे. सोशल मीडियाच्या या सल्ल्यामुळे शेअरमध्ये पैसा गुंतवणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. सोशल मीडियावर अशा टीप्स देणाऱ्यांविरोधात आता सेबीने कारवाई करण्याचे ठरवले आहे.
छोट्या शहरांमध्ये नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर टिप्स फक्त मोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित नसून, त्याचे जाळे अगदी छोट्या शहरांमध्येही सहज पसरते, कारण देशभरातील लोक आता सोशल मीडियाशी जोडलेले आहेत.
छापे मोठे असावेत
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा कर संस्थांकडून छापे टाकले जात असल्याने हे छापे मोठे असावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुराव्यांसाठी छाप्यांदरम्यान लॅपटॉप आणि मोबाईल फोन यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली जातील. आता नव्या योजनेअंतर्गत सेबीच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांना सूचित केले जाणार आहे.
नियामकांसह माहिती
व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या यूजर्सची विशिष्ट माहिती नियामकांसोबत शेअर करत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया ग्रुप्सबाबत पुरावे गोळा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरोपीचा फोन जप्त करणे हा आहे. 2014 मध्ये सरकारने सेबीला शोध आणि जप्तीचे अधिकार दिले होते, मात्र त्या अधिकारांचा वापर क्वचितच होतांना पाहायला मिळत आहे.
2017 मध्ये झाली होती छापेमारी
मागील आठवड्यात झालेल्या छापेमारीपूर्वी सेबीने 2017 साली व्हॉट्सअॅप लीक प्रकरणी मोठी कारवाई केली होती. सेबीला अशी माहिती मिळाली होती की, व्हॉट्सअॅपवर काही ग्रुप असे आहे की, ज्यांना टॉप लिस्टेड कंपन्याची माहिती मिळते, ज्याद्वारे ते इतरांना फसवण्याचे काम करत होते. त्यानंतर सेबीने त्या ग्रुपमधील ब्रोकरेज कर्मचाऱ्यांवर छापा टाकत कारवाई केली होती.
शेअर बाजाराने गुंतवणूकदार आकर्षित
भारतीय शेअर बाजारातील नुकत्याच झालेल्या तेजीने किरकोळ गुंतवणूकदार देखील आकर्षित झाले आहेत. यामुळे नवीन डिमॅट खाती उघडण्याचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र अनेक जण ग्रुपवर मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवत असून, शेअर बाजाराविषयी अधिकची माहिती नसलेले गुंतवणूकदार त्या ग्रुपला बळी पडत आहेत. काही ग्रुप तर 10,000 पासून 1 लाख रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.