आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिअल इस्टेट क्षेत्रासाठी नवीन वर्ष चांगले जाण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्तेची मागणी आणि किंमत दोन्ही वाढतील, परंतु भाडे कमी-अधिक प्रमाणात कायम राहील. कंपन्या मोठ्या प्रमाणावर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असल्याने कार्यालयीन विभागात अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. मागणी वाढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असेल. मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या २०२२ आऊटलूक अहवालानुसार पुढील वर्षी घरांच्या किमती सरासरी ५ % वाढतील. या वर्षी कोविड महामारीमुळे स्थावर मालमत्ता बाजारात जास्त अस्थिरता होती, परंतु नवीन वर्षात ही बाजारपेठ अधिक स्थिरावेल. यादरम्यान ई-कॉमर्स आणि थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्सच्या वाढत्या मागणीमुळे गाेदाम विभागातही वेगाने वाढ हाेण्याची अपेक्षा आहे.
कार्यालयाचे भाडे स्थिर राहील
नाइट फ्रँक इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “जागतिक सामायिक सेवा कंपन्यांसाठी भारत झपाट्याने पसंतीचे ठिकाण बनत आहे. तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही वाढ दिसून येत आहे. त्यामुळे कार्यालयीन जागेची मागणी वाढणार आहे.’ भाडे मात्र स्थिर राहणार आहे.
गाेदाम विभागात सर्वाधिक ३६ टक्के वाढ हाेण्याचा अंदाज
निवासी मालमत्ता | २०११ ते २०२१ मधील १० वर्षांच्या परिस्थितीच्या विश्लेषणानुसार २०२२मध्ये निवासी मालमत्तेच्या किमती सरासरी ५ टक्क्यांनी वाढतील.
गोदाम | २०१७ व २०२१ दरम्यान गोदामांची मागणी सरासरी २३ % वाढली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात गाेदामसंबंधित व्यवहारांमध्ये ३६% वाढ अपेक्षित आहे. इ-काॅमर्समुळे मागणी वाढत आहे.
डेटा सेंटर | आऊटलूक अहवालानुसार २०२२ मध्ये आयटी भार सुमारे २९० मेगावॅटने वाढेल. यासह पुढील वर्षाच्या अखेरीस देशातील एकूण माहिती तंत्रज्ञान क्षमता ७३५ मेगावॅटपर्यंत वाढेल.
सहकामकाज | महामारीमुळे एकाच कार्यालयात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रथा वाढली आहे. नव्या गरजेनुसार विविध प्रकारच्या कार्यालयांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
कार्यालयीन जागा | पुढील १-२ वर्षात आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून अंदाजे ११६.७ लाख चाैरस फूट कार्यालयीन जागेची मागणी येण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.