आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर घटण्याऐवजी चक्क वाढून १४.२३% झाला आहे. यापूर्वी डिसेंबर १९९१ मध्ये इतकी उच्चांकी पातळी होती. देशात घाऊक महागाई वाढण्याचा दर एप्रिलनंतर सलग दुहेरी अंकात आहे. केंद्राकडून मंगळवारी जारी घाऊक महागाईच्या आकडेवारीबाबत आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, ‘अंदाजापेक्षा जास्त महागाई वाढली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर ५% पेक्षा कमी होता. घाऊक महागाई १४% वर गेली आहे. यामुळे आगामी दिवसांत सामान्य ग्राहकांवर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. महागाई वाढीच्या आंतरराष्ट्रीय कारणांचा परिणाम फक्त भारतावरच झालेला नाही. सामान्यपणे महागाई वाढीचा कमी दर असलेल्या अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, सिंगापूर आदींतही नाेव्हेंबरमध्ये घाऊक महागाई २०% पर्यंत गेली आहे.
खाण्यापिण्याच्या पदार्थांचे दर दुप्पट वेगाने वाढले, भाजीपाल्याच्या महागाईचा १३ महिन्यांचा उच्चांक कच्चे तेल, नैसर्गिक वायू, धातू आदींतील दरवाढीमुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई वाढली आहे. कच्चे तेल नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत ३९.८१% महागले आहे. ही आकडेवारी यासाठी भीतिदायक आहे की, नोव्हेंबरमध्ये फूड इंडेक्सचे (खाण्यापिण्याच्या वस्तू) दर ६.७०% च्या दराने वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये ते ३.०६% वाढले होते. तज्ज्ञांनुसार, आगामी दिवसांत खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होऊ शकतात. भाजीपाल्याचा महागाई दर १३ महिन्यांच्या ४.९% या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. ते ऑक्टोबरमध्ये फक्त १.७% होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.