आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाची बातमी:Meta सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा, फेसबुकवर फोटो शेअर करून सांगितले बाळाचे नाव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा आला आहे. झुकेरबर्गची पत्नी प्रिसिला चॅन हिने एका मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती तिने फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली. झुकेरबर्गने फोटो पोस्ट करून लिहिले, "ओरिलिया चॅन झुकेरबर्ग, जगात आपले स्वागत आहे." खरच तू देवाचा एक आशीर्वाद आहेस. मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला यांचे हे तिसरे अपत्य आहे. याशिवाय झुकेरबर्गला 5 वर्षांचा 'अगस्था' आणि 7 वर्षांची मॅक्सिमा अपत्य आहेत.

झुकेरबर्गने 2 फोटो पोस्ट केले आहेत, एका फोटोमध्ये झुकेरबर्ग नवजात बाळाकडे पाहून हसताना दिसत आहे. दुसऱ्या चित्रात प्रिसिला चॅनसोबत न्यू बॉर्न बेबी दिसत आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टला 1.9 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. झुकेरबर्गच्या पोस्टवर लोक सतत कमेंट करून दोघांचे अभिनंदन करत आहेत.

झुकेरबर्ग आणि चॅन 2003 पासून एकत्र
मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅन 2003 पासून एकत्र आहेत. दोघांची भेट हार्वर्ड विद्यापीठात झाली. सप्टेंबर 2010 मध्ये त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून एकत्र असल्याची घोषणा केली होती आणि 2012 मध्ये दोघांनी लग्न केले.